ट्रिनिटी महाविद्यालयामध्ये संविधान दिन साजरा

पुणे : ट्रिनिटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने 26 नोव्हेंबर 2025 रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. 

या कार्यक्रमाच्या प्रसंगी, भारताच्या संविधानातील उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. मसुदा समितीमधील  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान पूर्ण झाले, त्याचा स्वीकार करून पुढे 26 जानेवारी 1950 पासून ते अमलात आणले गेले. या दिवसाचे स्मरण व्हावे आणि नागरिकांनी आपल्या राज्यघटनेप्रति सदैव जागरूक राहावे म्हणून आपण हा दिवस साजरा करत असतो असे प्रास्ताविक प्रा.धनाजी व्यवहारे यांनी केले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपप्राचार्य प्रा. भाऊसाहेब घोडके यांनी संविधानामुळेच आपण  स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक आहोत, राज्यघटनेने दिलेले मूलभूत अधिकार हे आपली ढाल म्हणून काम करून आपल्याला हक्क बहाल करत असले तरी त्यात दिलेली मूलभूत कर्तव्य आपल्याला आपल्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देतात असे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्राचार्य डॉ.शंकर लावरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. “15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र्य झाल्यावर, आपल्या देशाला चालवण्यासाठी कुठलेही संविधान नव्हते; म्हणून संविधान सभेची स्थापना करण्यात आली. पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, श्यामाप्रसाद मुखर्जी, मौलाना अब्दुल कलाम आझाद हे नेते घटना समितीच्या बैठकीचे प्रमुख सदस्य होते. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळून 26 नोव्हेंबर 1949 रोजी, दोन वर्षे 11 महिने 18 दिवस काम करून जगातील सर्वात मोठ्या लिखित संविधानाची निर्मिती केली आणि 26 जानेवारी 1950  पासून त्याची  अंमलबजावणी आपण सुरू करून देशातील लोकांमध्ये समान हक्क आणि समान अधिकारांबाबत विश्वास निर्माण केला. तसेच देशाचे संविधान हा सर्वात मोठा कायदा असून सर्वांनी संविधानाचा  आदर करायला हवा असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जागृती निर्माण होण्यासाठी प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले होते.या प्रश्नमंजुषेमध्ये महाविद्यालयातील शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी  सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे आभार प्रा. वैभवी जाधव यांनी मांडले. कार्यक्रमासाठी सर्व  प्राध्यापक आणि सहकारी सेवक उपस्थित होते.

See also  प्रत्येक क्षेत्रात देशाला अग्रेसर ठेवण्याची प्रेरणा पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या जीवनचरित्रातून- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह