सबा मतदार संघाच्या वतीने “डॉक्टर डे” डॉक्टरांचा सत्कार

पुणे : कसबा मतदार संघाचे निवडणूक प्रमुख, माजी स्थायी समिती अध्यक्ष पुणे मनपा हेमंत रासने, यांच्या नेतृत्वाखाली कसबा मतदारसंघात कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये जागतिक डॉक्टर दिनाचे औचित्य साधून हॉस्पिटल मधील प्रमुख डॉ. स्मिता सांगळे, डॉ. डांगे, सर्व सीनियर डॉक्टरांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला.

सूर्या हॉस्पिटल मध्ये डॉ.सुधाकर रणपिसे, यांचाही डॉक्टरांचा पूर्ण स्टाफ, तसेच डॉक्टर कोटणीस दवाखाना, (गाडीखाना हॉस्पिटल) , व ताराचंद हॉस्पिटल, तसेच कसबा मतदार संघातील प्रमुख हॉस्पिटल, तसेच खाजगी दवाखाने, क्लिनिक, साधारण ३५० डॉक्टरांना, जागतिक डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी, कसबा मतदारसंघातील सर्व नगरसेवक, नगरसेविका, शहर पदाधिकारी,कसबा मंडळ पदाधिकारी, सर्व प्रभागाचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमात कसबा निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांनी डॉक्टरांच्या बाबतीत कृतज्ञता व्यक्त केली, कोरोना काळामध्ये डॉक्टरांनी जे कार्य केलं त्या कार्याबद्दल त्यांना सलाम आहे, डॉक्टर डे असला तरी आज कामावर हजर राहून रुग्णांना तपासून त्यांच्या तब्येतीची काळजी, घेऊन त्यांच्यावर औषधोपचाराने सेवा करणाऱ्या डॉक्टरांबद्दल गौरव उद्गार काढले कामावरून समाजाची सेवा करून डॉक्टर डे साजरा करतात अशा डॉक्टरांच खास करून कौतुक केलं रासने यांनी केले.

See also  सुतारवाडी पाषाण महामार्गालगत अनाधिकृत हॉटेल्स वर कारवाई