बाणेर बालेवाडीत “आप” च्या स्वराज्य यात्रा निमित्त गरजू कुटुंबासाठी अन्न व आरोग्य योजना सुरू


औंध : औंध येथे आम आदमी पार्टीच्या स्वराज्य यात्रा निम्मित सुदर्शन जगदाळे यांच्या वतीने बाणेर बालेवाडी औंध येथील गरिब गरजू कुटुंबासाठी अन्न आणि आरोग्यासाठी नवीन उपक्रम सुरू करण्यात आला.

आम आदमी पार्टी आयोजित स्वराज्य यात्रा पंढरपूर ते रायगड कडे निघाली आहे. प्रामुख्याने शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी आणि महिलांचे राहणीमान उंचावले आणि सन्मान मिळावा म्हणून ही यात्रा चालू केली आहे. पुण्यात यात्रेचे आगमन झाले आहे. त्या निमित्ताने यात्रेतील काही व्यक्तींनी औंध येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अभिवादन केले आहे.
त्यानिमित्त आज औंध गावात सुदर्शन जगदाळे आणि मित्र मंडळाने गोरगरिबसाठी, विधवा महिला साठी महिन्याचा अन्नाचा खर्च आणि वर्षभरातील दोन आरोग्य शिबिर राबवून आरोग्याची काळजी घेतली जाईल. स्थलांतरित रोजगारासाठी पुण्यात आलेल्या नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, सामाजिक बांधिलकी म्हणून आपण त्यांच्या कुटुंबाला आधार दिला पाहिजे, ह्या हेतूने उपक्रम चालू केला आहे.

पुण्यात यात्रेचे आगमन झाले आहे. त्या निमित्ताने यात्रेतील काही व्यक्तींनी औंध येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अभिवादन करण्यात आले.
औंधगावात सुदर्शन जगदाळे आणि मित्र मंडळाने गोरगरिबसाठी, विधवा महिला साठी महिन्याचा अन्नाचा खर्च आणि वर्षभरातील दोन आरोग्य शिबिर राबवून आरोग्याची काळजी घेतली जाईल. स्थलांतरित रोजगारासाठी पुण्यात आलेल्या नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, सामाजिक बांधिलकी म्हणून आपण त्यांच्या कुटुंबाला आधार दिला पाहिजे, ह्या हेतूने उपक्रम चालू केला आहे.

यावेळी आम आदमी पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद, संदीप घाडगे, अभिजित परदेशी, ज्योती ताकवले, आरती करांजवने, सीमाताई गुट्टे, शंकर थोरात, रवींद्र पाडले, अनिल कोंढाळकर, सचिन कोतवाल, प्रशांत कांबळे, आबासाहेब कांबळे, अमित म्हस्के, मैथिली जगदाळे, किरण कांबळे, विक्रम गायकवाड, रवी लाटे,बाबासाहेब चव्हाण, ऋषिकेश कानवटे, रविराज काळे, सूर्यकांत सरवदे, आसिफ मोमीन आदी उपस्थित होते.

See also  हिवरे कुंभार शाळेची शिष्यवृत्ती परंपरा अखंडित

यावेळी औंधगाव विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष : योगेश जुनावणे,
खजिनदार: हेरंब कालापुरे,विश्वस्त: विकास गायकवाड,सल्लागार: रणजित कलापुरे यांचा आम आदमी पार्टीच्या वतीने सत्कार करण्यात आला.