स्वर्गीय खासदार विठ्ठलराव तुपे पाटील स्मार्ट लर्निंग स्कूल मध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला “संविधानाचे दीपस्तंभ” नाटक सादरीकरण

हडपसर :स्वर्गीय खासदार विठ्ठलराव तुपे पाटील स्मार्ट लर्निंग स्कूल, माळवाडी येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी  *”संविधानाचे दीपस्तंभ”* हे विषयानुरूप नाटक सादर करून भारतीय संविधानातील मूलभूत हक्क, कर्तव्ये आणि त्याचे समाजहितातील महत्त्व प्रभावीपणे मांडले.

विद्यार्थ्यांनी घटनादुरूस्ती, समानता, स्वातंत्र्य आणि न्याय या संविधानाच्या मूल्यांचे नाट्यरूपातून उत्कृष्ट सादरीकरण केले. त्यांच्या संवादांमधून संविधान आपल्याला जोडणारा धागा असून प्रत्येक नागरिकाने त्याचे पालन करणे किती गरजेचे आहे, हा संदेश प्रभावीपणे पोहोचला. नाटकामध्ये संविधानाच्या आत्म्याच्या भूमिकेत संभव कांबळे या विद्यार्थ्याने काम केले शिक्षिकेच्या भूमिकेत अस्मिता माने मॅडम , आईच्या भूमिकेत अनुराधा शिंदे मॅडम ,विद्यार्थ्यांच्या भूमिकेत सायली, दिशा, सोहम , पार्थ, मोहम्मदसाद,आर्यन,यश, तुषार आणि इयत्ता सहावीतील सर्व विद्यार्थी यांनी काम केले. नाटकाचे चित्रीकरण इशिता कांबळे या विद्यार्थिनीने केले. नाटकाचे लेखन, दिग्दर्शक, मार्गदर्शन सूत्रसंचालन अक्षयकुमार कांबळे सरांनी केले.

कार्यक्रमात सुरुवातीला संविधान उद्देशपत्रिकेचे वाचन शिवाजी गावडे सरांनी करून घेतले.कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी **संविधान विषयक प्रश्नमंजुषा सलमा शेख मॅडम यांनी घेतली. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी संविधानाबाबतचे आपले ज्ञान प्रदर्शित केले. योग्य उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक सुनिल कोळेकर सरांनी केले.

शाळेचे मुख्याध्यापक विनायक पुणेकर सरांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे अभिनंदन केले आणि भारतीय संविधान व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती सांगितली.सर्व शिक्षक, सेवक, बालवाडी शिक्षिका ,बालवाडी सेविका या सर्वांनी संविधानिक मूल्यांचे संवर्धन करण्याची शपथ घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

See also  हडपसर येथे निवडणूकीसाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न