नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्या वतीने पाषाण येथे पालखी सोहळ्याचे आयोजन

पाषाण : पाषाण येथे नवचैतन्य हास्य योग परिवार च्या वतीने आषाढी वारी निमित्त पाषाण मध्ये वाकेश्वर चौक परिसरात पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

पाषाण परिसरातील वारीमध्ये ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. यावेळी महिलांनी डोक्यावर तुळशी वृंदावन व विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेत विठ्ठल नामाचा गजर करत टाळ मृदंगाच्या गजरात पालखी काढण्यात आली.


वाकेश्वर चौक ते वाकेश्वर विठ्ठल रखुमाई मंदिर पालखी काढण्यात आली यावेळी महिलांनी फेर धरत भजन गवळण सादर केल्या.

पालखी सोहळ्यामध्ये नवचैतन्य हास्य परिवार शाखा क्रमांक 115 मधील सर्व सदस्य सहभागी झाले होते.
सायंकाळी या महिन्यांमध्ये वाढदिवस असलेल्या सर्व सदस्यांचा तसेच लग्नाचा वाढदिवस असलेल्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

See also  येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानांसाठी ‘तणावमुक्ती’ बाबत व्याख्यानाचे आयोजन