हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये ईगल वॉरियर विजेता

पाषाण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रभाग क्रमांक नऊ च्या वतीने हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये विजेता ईगल वॉरियर तर उपविजेता स्काय इलेव्हन ठरले.

या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज निखिल अरगडे, उत्कृष्ट गोलंदाज ऋषिकेश सुतार, सामनावीर ऋषिकेश निम्हण यांनी पटकाविले.
बक्षीस वितरण समारंभाला शिवसेना पुणे शहर प्रमुख गजानन थरकुडे, ज्येष्ठ शिवसैनिक वाडेश्वर सुतार, सामाजिक कार्यकर्ते दिलीप रणपिसे, महिला उपशहर संघटिका ज्योती चांदेरे , युवा सेना उपशहर प्रमुख मयूर भांडे, अशोक दळवी, स्वाती रणपिसे ,सुनीता रानवडे ,महेश सुतार, विजय दाभाडे,अमोल फाले, रोहित लोंढे, सुरज चोरमुले, शशिकांत सुतार ,शाम सुतार ,सुखदेव जगदाळे व क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.
या क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले होते शिवसेना कोथरूड विधानसभा विभाग प्रमुख संतोष तोंडे यांनी.

See also  अखिल भारतीय मराठा महासंघाचा आ. रवींद्र धंगेकरांना पाठींबा