सुस–बाणेर–पाषाण प्रभाग क्रमांक ९ मध्ये पूनम विधाते यांचा संवादात्मक प्रचार दौरा

बालेवाडी: सुस बाणेर पाषाण प्रभाग क्रमांक ९ अंतर्गत बाणेर–बालेवाडी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पूनम विशाल विधाते यांनी प्रचार दौऱ्यादरम्यान नागरिकांशी प्रत्यक्ष भेटी घेत संवाद साधला. या वेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी परिसरातील प्रश्न, सुरू असलेली विकासकामे तसेच आगामी गरजांबाबत सविस्तर चर्चा केली.

वाहतूक कोंडी, पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छता व्यवस्था आणि उद्यान सुविधांबाबत नागरिकांनी आपल्या अडचणी व सूचना मोकळेपणाने मांडल्या. नागरिकांच्या या मोलाच्या सूचनांची दखल घेत सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्याने पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन पूनम विधाते यांनी दिले.

या संवादातून नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद आणि आमच्यावरील विश्वास स्पष्टपणे जाणवला. नागरिकांच्या सहकार्याने प्रभागातील विकासकामांना अधिक गती देऊन सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

See also  राज्यातील वाळू घाटांचे लिलाव ३० डिसेंबरपर्यंत पूर्ण करा- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे