महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) या जनहितकारी योजनच्या तरतुदींमध्ये बदल केल्याच्या निषेधार्थ केंद्र शासनाच्या विरोधात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे निषेध आंदोलन

पुणे : काँग्रेस प्रणित केंद्र शासनाने आपल्या कार्यकाळात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ही जनहितकारी योजना निश्चित केली होती. मात्र भाजप प्रणित केंद्र शासन हे महात्मा गांधींचे नाव या योजनेतून वगळण्याचे काम करीत आहे. तसेच या योजनेमधील अनेक हितकारी तरतुदींमध्ये बदल करण्याचे ठरविले आहे, हे अत्यंत निंदनीय आहे याच्या निषेधार्थ आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ही योजना सुरू होती. सामाजिक न्याय आणि श्रमाला प्रतिष्ठा देण्याचे कार्य महात्मा गांधींनी केलेले आहे. महात्मा गांधींजीच्या नावे सुरू केली गेलेली मनरेगा ही योजना व त्यातील हितकारी तरतुदी बदलेल्या कदापीही आम्ही सहन करून घेणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा यांना गांधी नावाची अलर्जी झाली आहे. झोपेत सुध्दा त्यांना गांधीच दिसतात. त्यांना वाटते गांधींचे नाव बदलले तर भाजपाला वाटणारी भिती कमी होईल. परंतु महात्मा गांधींचे विचार हे सर्व विश्र्वाने स्विकारले आहेत. सत्तर काय सातशे वर्षे सुध्दा गांधी-नेहरू यांचे विचार व कार्य कोणीही पुसू शकणार नाही. एकीकडे महात्मा गांधीचे अहिंसेचे विचार संपवून शांती सारखा नवा कायदा अमंलात आणून देशाची सुरक्षितता व्‍यापाऱ्यांना विकण्याचा कारभार भाजप सत्तेत बसून करीत आहे. १९४८ साली महात्मा गांधींचा खून करून त्यांना संपविण्याचा कट पूर्णत्वाला गेला असला तरी २०२५ मध्ये त्यांचे विचार संपविण्याचा रचलेला कट यशस्वी होऊ देणार नाही .यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष माजी आमदार रमेश बागवे व खजिनदार ॲड. अभय छाजेड यांनी ही आपली प्रखर मते व्‍यक्त केली.

यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या समवेत म.प्र.काँ.चे वरिष्ठ उपाध्यक्ष माजी आमदार रमेश बागवे, खजिनदार ॲड. अभय छाजेड, अजित दरेकर, लता राजगुरू, सुनिल शिंदे, प्राची दुधाने, सिमा सावंत, राजेंद्र भुतडा, सुजित यादव, हेमंत राजभोज, रमेश सोनकांबळे, रमेश सकट, रवि आरडे, महिला अध्यक्षा स्वाती शिंदे, ॲड. राजश्री अडसूळ, ज्योती चंदवेळ, अनिता धिमधिमे, ज्योत परदेशी अनुसया गायकवाड, माया डुरे, संगीता क्षिरसागर, तारा शर्मा, आस्मा खान, संगीता पवार, प्रमोद निनारिया, राकेश नामेकर, नेर शेख, देवीदास लोणकर, सुरेश नागंरे, अविनाश अडसुळ, प्रकाश पवार, अकबर शेख, अरूण वाघमारे, सचिन भोसले, मतीन शेख, अक्षय जैन, सुरेश चौधरी, भगवान कडू आदीसह असंख्य काँग्रेसजण उपस्थित होते.

See also  मोदी सरकारची गॅरंटी हुकूमशाहीकडे नेणारी -सुषमा अंधारे