ज्योती नितीन चांदेरे सोशल फाउंडेशन च्या वतीने ‘सोसायटी क्रिकेट प्रीमियर लीग’ सुरू

पाषाण : ज्योती नितीन चांदेरे सोशल फाउंडेशन द्वारे बाणेर बालेवाडी सुस महाळुंगे सोमेश्वर वाडी सुतारवाडी पाषाण परिसरातील नागरिकांसाठी आयोजित सोसायटी क्रिकेट प्रिमियर लीग पाषाण येथे कुरुक्षेत्र क्रीडांगण येथे सुरू करण्यात आले आहे.

या स्पर्धेमध्ये 70 हुन सोसायटीच्या संघांनी सहभाग घेतला असून महिला वर्गाने केवळ सहभाग नोंदवला नाही, तर मैदानावर आपला दमदार ठसा उमटवला आहे. क्रिकेट स्पर्धेत दरम्यान जोशपूर्ण घोषणाबाजी, टाळ्यांचा कडकडाट आणि संघभावनेने भरलेला खेळ यामुळे प्रत्येक सामना रंगतदार झाला आणि प्रेक्षकांनाही क्रिकेटचा मनसोक्त आनंद घेता आला.

यावेळी ज्योती चांदेरे, नितीन चांदेरे तसेच बाणेर बालेवाडी सुस म्हाळुंगे पाषाण परिसरातील विविध सोसायट्यांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

See also  अल्पसंख्याक समाजासाठीच्या कर्ज योजनेला इच्छुकांचा चांगला प्रतिसाद; ३१ मेपर्यंत नवीन अर्ज करण्याची संधी