प्रभाग क्रमांक ०८ मध्ये विकासकामांना गती; सपना आनंद छाजेड यांचा जनतेशी थेट संवाद

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ०८ (औंध – बोपोडी) येथे सामाजिक, शैक्षणिक व नागरी सुविधा विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या सौ. सपना आनंद छाजेड यांनी परिचय कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधत सेवा, समर्पण आणि विकासाचा आदर्श ठेवला आहे.

प्रभागातील पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य शिबिरे, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम, तसेच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदतीचे कार्यक्रम राबविण्यावर त्यांनी विशेष भर दिला आहे. नागरिकांच्या समस्या ऐकून त्या तत्काळ मार्गी लावण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधत प्रभावी पाठपुरावा केला जात आहे.

तसेच सामाजिक संस्था, कार्यकर्ते, नागरिक प्रतिनिधी यांच्यासोबत सातत्याने बैठका घेऊन प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा राबविला जात आहे. विविध मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींमधून सकारात्मक ऊर्जा व प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

“परिचय कार्यालय हे केवळ कार्यालय नसून, ते जनतेच्या सेवेसाठी खुले असलेले व्यासपीठ आहे,” असे सांगत सौ. सपना आनंद छाजेड यांनी प्रभागातील नागरिकांच्या सहकार्यामुळेच विकासाची कामे प्रभावीपणे पूर्ण होत असल्याचा विश्वास व्यक्त केला.
प्रभागातील विकासकामे, सेवा उपक्रम आणि जनतेशी असलेली आपुलकी यामुळे सपना आनंद छाजेड यांचे कार्य नागरिकांमध्ये कौतुकास्पद ठरत आहे.

See also  प्रत्येकी एक हजार रुपये नोंदणी शुल्क व मुद्रांक शुल्काच्या बदल्यात शेतजमिनीची अदला बदल करण्याची सलोखा योजना राज्यात कार्यान्वित- मुद्रांक महानिरीक्षक हिरालाल सोनवणे