दत्तात्रेय गायकवाड महापौर असताना तयार करण्यात आलेला सिमेंट काँक्रेट चा रस्ता 25 वर्षानंतरही खड्डे न पडता सुस्थितीत.

औंध : माजी महापौर दत्तात्रय गायकवाड हे होऊ घातलेल्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग आठ मधून भारतीय जनता पक्षा चे प्रमुख दावेदार म्हणून समोर येत आहेत. त्यांनी महापौर असताना तसेच नगरसेवक असताना केलेल्या दर्जेदार कामांच्या जोरावर ते प्रभाग आठ मध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रमुख दावेदार म्हणून पुढे येत आहेत.

दत्तात्रय गायकवाड महापौर असताना पुणे महानगरपालिकेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त पुणे परिसरातील प्रमुख रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्याचे ठरले. त्याचाच भाग म्हणून पुणे विद्यापीठ ते राजभवन ते औंध हा रस्ता पुणे महानगरपालिका परिसरातील पहिलाच सिमेंट काँक्रीट चा रस्ता करण्यात आला. या रस्त्याचे वैशिष्ट्य म्हणजे 25 वर्षानंतरही या रस्त्याला अजून पर्यंत खड्डे पडले नाहीत व हा रस्ता अजूनही प्रशस्त असा चांगल्या स्थितीत आहे. यामुळे औंध परिसरांमधून वेगवान वाहतुकीस सुरुवात झाली व याचाच परिपाक औंध चा झपाट्याने विकास होत गेला.

पुणे विद्यापीठ ते राजभवन ते औंध या रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणानंतर पुणे शहरातील इतर प्रमुख रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात आले.औंध भाग हा पुणे शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जातो. मुंबई शहराच्या बाजूने तसेच पिंपरी चिंचवडच्या बाजूने पुणे शहरांमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रामुख्याने औंध बाजूने प्रवास करण्यास वाहन चालक प्राधान्य देतात. त्यामुळे पुणे शहरांमध्ये प्रवेश करतात हा प्रशस्त रस्ता असल्यामुळे पुणे शहराच्या वैभवात भरच पडत आहे.

या रस्त्याला अनेक ऐतिहासिक आस्थापने देखील आहेत त्यामध्ये राजभवन, पुणे विद्यापीठ प्रवेशद्वार, बॉईज बटालियन ( या ठिकाणी संरक्षण दलातील कर्मचारी वास्तव्यास आहेत ), सिंध कॉलनी अशा महत्त्वाच्या भागांचा समावेश होतो.

दत्तात्रेय गायकवाड ( माजी महापौर )
या रस्त्यामुळे औंध परिसराचा झपाट्याने विकास होत गेला. पुणे शहराचे प्रवेशद्वार असलेल्या औंध परिसरामध्ये हा रस्ता विकसित करण्यात आल्यामुळे शहराच्या वैभवात भर पडली. औंध परिसरातील नागरिकांना पुणे शहरांमध्ये जाण्यासाठी तसेच पुणे शहरांमधून औंध परिसरामध्ये येण्यासाठी वाहतूक वेगवान झाल्यामुळे अनेक व्यावसायिक आस्थापनांनी आपल्या व्यवसायासाठी औंध परिसराची निवड केली. अनेक बांधकाम व्यावसायिकांनी आपले प्रकल्प बांधण्यासाठी प्रामुख्याने औंध परिसराची निवड केली. यामुळे औंध परिसराचा झपाट्याने विकास झाला.

See also  लोकशाही संपवण्याचे भाजपाचे षडयंत्र, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेसचा लढा: रमेश चेन्नीथला