झोपेचे सोंग घेतलेले पुणे महानगरपालिकेचे आयुक्त जागे कधी होणार

बाणेर : बालेवाडी सारख्या स्मार्ट सिटी एरिया मधील सोसायटीमध्ये ड्रेनेजचा प्रश्न गंभीर आहे. अनेक वृत्तपत्रांतून या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम देखील झाले. नागरिकांना देखील उडवा उडवीचे उत्तरे दिली जात आहेत परंतु चुकलेली कामे दुरुस्त करणे तसेच भूमिका घेऊन नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर झालेला प्रश्न सोडवणे याबाबत मात्र आयुक्त गंभीर नसल्याचे पाहायला मिळत आहे.

साई सिलिकॉन व्हॅली, संस्कृती होम या बालेवाडी मधील सोसायटीमध्ये सांडपाणी शिरत असून परिसरात दुर्गंधी निर्माण झाली आहे. तर सुतारवाडी येथील मनपा शाळेजवळ गेले वर्षभरापासून रस्त्यावर सांडपाणी पालिकेच्या ड्रेनेज मधून येत आहे.

पुणे महानगरपालिकेला कळवून देखील याबाबत योग्य कारवाई होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. म्हणून महिनोन महिने , वर्षभर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवण्यास पालिका अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. तसेच वरिष्ठ अधिकारी देखील याबाबत योग्य कारवाई करत नसल्याने नागरिकांनी हा प्रश्न पुणे महानगरपालिका आयुक्त यांना देखील कळवला.

महाळुंगे गावामध्ये देखील शंकर मंदिरा जवळ मोठ्या प्रमाणात मोकळ्या पटांगणावर सांडपाणी साठते. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असताना पालिका अधिकारी कायम स्वरुपी उपाययोजना करत नाहीत आणि आयुक्त देखील कारवाई करत नाही. यामुळे झोपेचे सोंग घेतलेल्या आयुक्तांना जाग कधी येणार व आमच्या समस्या कधी सुटणार असा प्रश्न नागरिक, सोसायट्यांचे प्रतिनिधी विचारत आहेत.

See also  शिवसृष्टीला आर्थिक पाठबळ देण्यासाठी उद्योग क्षेत्राला आवाहन करू - उद्योगमंत्री