बाणेरमध्ये काँग्रेसचा झंझावाती प्रचार दौरा; वृषाली चाकणकर यांच्या घरोघरी संवादातून काँग्रेस पक्षाच्या विकास कामांची आठवण

बाणेर : बाणेर परिसरात काँग्रेस पक्षाच्या प्रचाराला चांगलाच वेग आला असून काँग्रेसचे युवा नेते जीवन चाकणकर यांच्या पत्नी सौ. वृषाली चाकणकर यांनी बाणेर परिसरात झंझावाती प्रचार दौरा करत घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला. या प्रचारादरम्यान काँग्रेस पक्षाच्या कालखंडात झालेली महत्त्वाची विकासकामे नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात आली.

सन 2008 मध्ये बालेवाडी येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मुख्य बाणेर रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले होते. त्याचबरोबर बाणेर व पाषाण परिसरातील अंतर्गत रस्त्यांची कामे देखील काँग्रेस पक्षाने मार्गी लावल्याची माहिती यावेळी मतदारांपर्यंत देण्यात आली.
प्रचारादरम्यान नागरिकांनी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक असताना झालेली विकासकामे आणि त्यानंतर इतर पक्षांच्या काळात झालेल्या कामांची तुलना करत काँग्रेसच्या कार्यकाळातील कामांची आठवण करून दिली. अनेक नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देत “काँग्रेसच्या काळात नियोजनबद्ध व दर्जेदार कामे झाली” अशी भावना व्यक्त केली.

वृषाली चाकणकर यांनी प्रत्येक गल्लीत, सोसायटीत जाऊन नागरिकांच्या अडचणी ऐकून घेतल्या तसेच काँग्रेस पक्षाच्या विकासात्मक धोरणांची माहिती दिली. घरोघरी जाऊन थेट संवाद साधत केलेल्या या प्रचारामुळे बाणेर परिसरात काँग्रेस पक्षाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.

या प्रचार दौऱ्यामुळे बाणेर परिसरात काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा सक्रिय होत असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा जनसंपर्क अधिक मजबूत होत असल्याचे संकेत मिळत आहेत.

See also  काँग्रेस ज्याच्या गळयात पडते त्याचे बुडणे निश्चित; केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची टीकाउद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी बुडणारसिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारासाठी सभेचे आयोजन