सुनिल देवधर भाजपच्या प्रचारात दिसेनात !

पुणे : भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर भारतीय जनता पक्षाच्या पुण्यातील प्रचारात दिसेनात, त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा होत आहे.

लोकसभेची उमेदवारी मिळावी याकरिता देवधर इच्छुक होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या कार्यकारिणीतून देवधर यांना वगळले. पुण्यात निवडणूक लढविण्यासाठी त्यांना ‘मोकळे ‘करण्यात आले असे त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जात होते. देवधर यांनीही नेटाने प्रचार चालविला होता.रा. स्व. संघाचे अनेक स्वयंसेवक देवधर यांच्या प्रचारात सहभागी होते. मात्र वरिष्ठ पातळीवरून देवधर यांना पाठिंबा मिळत नव्हता. उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस ठामपणे मुरलीधर मोहोळ यांच्या उमेदवारीसाठी उभे होते. दरम्यान, मेधा कुलकर्णी यांना राज्यसभा सदस्यत्व मिळाले. त्याच वेळी देवधर यांच्या उमेदवारीच्या आशा संपल्या होत्या. त्यावेळी ते राजकीय मौनात गेले, अजूनही पुण्यातील प्रचारात . दिसेना झाले आहेत .

भाजपमध्ये सारे आलबेल नाही असे लक्षात येते. माजी खासदार काकडेही नाराज आहेत, त्यांनी तर उमेदवार बदला अशी मागणी केली होती.

See also  खराडीतील मे.विलास जावडेकर डेव्हलपर्स यांच्या Yashwin Orizzonte  या बांधकामास  3 कोटी 10 लाख दंड रयत स्वाभिमानी संघटनेच्या मागणीला यश