राष्ट्रीय शालेय क्रीडा फेंसिंग स्पर्धेत शौर्याचा सुवर्ण–रौप्य पराक्रम

संभाजीनगर : राष्ट्रीय शालेय क्रीडा फेंसिंग स्पर्धा २०२५ (२२ ते २५ डिसेंबर) मध्ये भारती विद्यापीठ रवींद्रनाथ टागोर स्कूल ऑफ एक्सलन्सची विद्यार्थिनी शौर्या गणेश इंगवले (वय १३) हिने महाराष्ट्रासाठी उत्कृष्ट कामगिरी करत वैयक्तिक प्रकारात सुवर्ण तर संघ प्रकारात रौप्य पदक पटकावले.

शौर्याने उपांत्य फेरीत हरियाणाच्या लक्षिता हिला १५–१४ अशा अटीतटीच्या सामन्यात पराभूत केले, तर अंतिम फेरीत प्राचीवर १५–१३ असा विजय मिळवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तिच्या या यशामुळे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

या यशामागे रवींद्रनाथ टागोर स्कूल ऑफ एक्सलन्सच्या उच्च व्यवस्थापनाचा मोलाचा पाठिंबा लाभला. शाळेच्या चेअरपर्सन स्वप्नाली कदम मॅडम यांच्यासह प्राचार्या जुमाना मॅडम व उपप्राचार्या पुष्पा मॅडम यांच्या मार्गदर्शनामुळे व प्रोत्साहनामुळे विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना चालना मिळत आहे.

या यशाचे श्रेय मुख्य प्रशिक्षक श्वेता आव्हाड मॅडम, तसेच बोम्मई सर, विक्टर सर, बेनिश सर आणि फिजिओथेरपिस्ट सुरभी मॅडम यांच्या मार्गदर्शन व सातत्यपूर्ण पाठिंब्याला जाते. तसेच महाराष्ट्र फेंसिंग असोसिएशनचे सचिव डॉ. उदय डोंगरे व पुणे फेंसिंग असोसिएशनचे सचिव श्री. अविनाश दुधाने यांचेही सहकार्य लाभले.

See also  ‘मिशन समर्थ’ अंतर्गत महानिर्मितीच्या जैव इंधन कार्यशाळेचे उद्घाटन : जैव इंधनाची गुणवत्ता आणि घनता यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे