निर्भीडपणा, प्रामाणिकपणा आणि संघर्ष : जयेश मुरकुटे प्रभाग ९ च्या राजकारणाच्या केंद्रस्थानी शरद पवार यांचा आश्वासक चेहरा

पुणे : प्रभाग क्रमांक ९  जयेश मुरकुटे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीने ‘9 ब’ या गटामध्ये उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस, महाळुंगे गावांमध्ये एक तरुण आश्वासक चेहरा जयेश संजय मुरकुटे यांना बाणेर बालेवाडीतील प्रस्थापित राजकीय लोकांनी संपवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र शरद पवार साहेबांचा आश्वासक चेहरा म्हणून ओळख मिळालेला जयेश मुरकुटे याला खुद्द पवार साहेबांच्या शिफारसीने तुतारीचे चिन्ह देतो उमेदवारी देण्यात आली. अवघ्या २४ वर्षांचा तरुण जयेश संजय मुरकुटे विरोधकांवर पहिल्याच प्रयत्नात मान्यता प्राप्त पक्षाचे उमेदवारी मिळवल्याने प्रभाग क्रमांक ९ मध्ये राजकारणातील महत्त्वाचा चेहरा ठरत आहे.

राजकारणात खालच्या पातळीवर न बोलता, चुकीच्या कामावर निर्भीडपणे बोट ठेवणारा तरुण नेता म्हणून जयेश संजय मुरकुटे यांची ओळख आहे. कोणत्याही दबावाला न घाबरता जनतेसाठी आवाज उठवण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे.

या प्रामाणिक आणि निर्भीड भूमिकेची दखल घेत शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी वैयक्तिक लक्ष घालून जयेश संजय मुरकुटे यांच्यावर विश्वास टाकला आहे. त्याच विश्वासातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्षाकडून जयेश संजय मुरकुटे यांच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

प्रभाग क्रमांक 9 ब नागरिकांच्या मागासवर्गीय राखीव गटामध्ये मध्ये स्थानिक दिग्गज कार्यकर्ते उभे राहिले आहेत. यामध्ये सर्वाधिक तरुण नेतृत्व सध्या बाणेर बालेवाडी पाषाण परिसरामध्ये आपल्या प्रभावशाली प्रचारशैलीतून आक्रमकपणे नागरिकांच्या पसंतीस उतरत आहे. यामुळे दिग्गजांच्या गर्दीत देखील जयेश चा आश्वासन चेहरा सध्या लक्षवेधी ठरत आहे.

See also  सिंगापूरला निघाले 'दगडूशेठ' चे गणपती बाप्पा ...श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; सिंगापूरमध्ये साजरा होणार पाच दिवसांचा गणेशोत्सव