प्रभाग क्रमांक 4 मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार अमृत पठारे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन

पुणे | पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रभाग क्रमांक 4 मधील अधिकृत उमेदवार सौ. अमृत कैलास पठारे यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात पार पडले.
हे उद्घाटन शिवसेना उपनेते, आमदार व संपर्कप्रमुख माननीय सचिन भाऊ अहिर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी परिसरातील शिवसैनिक, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमास शिवसेना आमदार उपनेते सचिन भाऊ अहिर, शिवसेना उपनेते व संपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी बोलताना माननीय सचिन भाऊ अहिर यांनी सांगितले की, “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी कायम लढणारा पक्ष आहे. प्रभाग क्रमांक 4 मध्ये सौ. अमृत पठारे यांच्या माध्यमातून सक्षम, अभ्यासू आणि लोकाभिमुख नेतृत्व मिळणार आहे.”

सौ. अमृत पठारे यांनी यावेळी मतदारांशी संवाद साधत, परिसरातील मूलभूत सुविधा, महिला सक्षमीकरण, स्वच्छता, पाणीपुरवठा व विकासकामांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला.या कार्यालयाच्या उद्घाटनाने प्रभाग क्रमांक 4 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रचाराला अधिक गती मिळाल्याचे चित्र दिसून आले.

See also  राष्ट्रीय शालेय रग्बी क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचा मुलांचा संघ उपविजेता तर मुलींच्या संघास कांस्य पदक