पुणे : निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत उत्तरदायित्वाची मागणी करण्यासाठी शांततामय व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह इंडिया आघाडीच्या खासदारांना पोलिसांनी अडवून त्यांच्यावर लाठीचार्ज केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आजचा दिवस ‘भारतीय लोकशाहीसाठी काळा दिवस’ म्हणून पाळला.
केंद्र सरकारच्या कथित दडपशाहीचा निषेध करण्यासाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बालगंधर्व चौक येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात केंद्रातील भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. लोकप्रतिनिधींवर झालेला हल्ला हा जनतेच्या अधिकारांवर तसेच संविधानिक मूल्यांवर हल्ला असल्याचा आरोप यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला.
लोकशाही, संविधान आणि नागरिकांच्या अधिकारांच्या रक्षणासाठी संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. केंद्र सरकारच्या दडपशाहीचा निषेध करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
आंदोलनास प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार, नगरसेवक रफिक शेख, खजिनदार चंद्रशेखर कपोते, भाऊसाहेब आजबे, उपाध्यक्ष राजाभाऊ कदम, इंटक अध्यक्ष चेतन अगरवाल, युवक काँग्रेस अध्यक्ष सौरभ अमराळे, सेवादल अध्यक्ष लतेंद्र भिंगारे, महिला अध्यक्षा स्वाती शिंदे, प्रथमेश अबनावे, संजय मोरे, विजय साबळे, शिवानी मोरे, राहुल वंजारी, गुलामहुसेन खान, राजेंद्र भुतडा, कैलास गायकवाड, दीपक ओव्हाळ, ॲड. योगेश माकणे, किशोर मारणे, धीरज खोरे, समद शेख, प्रियांका मधाळे, ऋषिकेश जाधव, सुभाष जेधे, विशाल जाधव, चैतन्य पुरंदरे, युवराज मदगे, सुरेश नांगरे, सेल्वराज ॲन्थोनी, प्राजक्ता जाधव यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















