सूस : भव्य मिरवणुकीत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने प्रभाग क्रमांक ९ मधील प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादात आणि जल्लोषात भव्य मिरवणूक काढण्यात आली.
महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे अधिकृत उमेदवार श्री. जीवन चाकणकर यांनी या प्रचार मोहिमेची सुरुवात केली. विकास, पारदर्शकता आणि लोकहिताचा ठाम संकल्प घेऊन जनतेच्या विश्वासावर परिवर्तनाची वाटचाल सुरू करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मिरवणुकीदरम्यान परिसरातील नागरिक, युवक, महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. घोषणाबाजी, फलक, ढोल-ताशांच्या गजरात संपूर्ण परिसर उत्साहाने भारावून गेला होता.
प्रभागातील पायाभूत सुविधा, नागरी समस्या, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि वाहतूक व्यवस्थेसह सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास उमेदवार श्री. जीवन चाकणकर यांनी नागरिकांना दिला. या प्रचार शुभारंभामुळे प्रभाग क्रमांक ९ मधील निवडणूक वातावरण चांगलेच तापले असल्याचे चित्र दिसून आले आहे.
























