पुणे : कोहिनूर फालगन येथे महाविकास आघाडीच्या प्रचार कार्यालयाचे नारळ फोडून विधिवत उद्घाटन करण्यात आले. या वेळी महाविकास आघाडीच्या प्रचाराला अधिकृत सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमास शिवसेना संपर्कप्रमुख आमदार सचिन भाऊ अहीर, शहरप्रमुख गजानन थरकुडे, ज्योतीताई नितीन चांदेरे, संदीप बलवाडकर, जीवन चाकणकर, नितीन भाऊ चांदेरे, अजिंक्य सुतार, करण भाऊ कांबळे, दिनेश नाथ आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनानंतर सुसगाव परिसरामध्ये प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने घराघरात जाऊन नागरिकांशी संवाद साधत प्रचार करण्यात आला. सुसगाव परिसरातील नागरिकांनी प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, विशेषतः महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती लक्षणीय ठरली.
महाविकास आघाडीच्या माध्यमातून विकास, पारदर्शकता आणि लोकहिताचे राजकारण करण्याचा निर्धार यावेळी उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला. प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनामुळे परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी निवडणुकीसाठी प्रचाराला वेग आला आहे.
























