पुणे : भारतीय जनता पार्टी, पुणे शहरच्या शासकीय योजना आघाडीची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे आणि शासकीय योजना आघाडीचे अध्यक्ष गणेश शेरला यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची घोषणा केली.
केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे, पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करणे तसेच शासकीय योजनांबाबत जनजागृती करणे, हा या आघाडीचा प्रमुख उद्देश आहे. नागरिकांच्या शासकीय योजनांसंदर्भातील अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सहकार्य करण्यावरही भर देण्यात येणार आहे.
सरचिटणीसपदी किरण वैष्णव, राजेंद्र भोसले, गौतम बनसोडे आणि सुशांतदास चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कायदेशीर सल्लागार म्हणून ॲड. श्रीधर कसबे आणि ॲड. किशोर काळे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
उपाध्यक्षपदी नियुक्त झालेले पदाधिकारी : दीपक कांबळे (वडगाव शेरी), हनीफ शेख जमादार (खडकवासला), अशोक लाकडे (शिवाजीनगर), दिव्या लोळगे (कसबा), विकी उमादे (कॅन्टोन्मेंट), सागर पालकर (कसबा), गणेश पवार (पर्वती), प्रसाद जांभुळकर (खडकवासला), तुकाराम खंडागळे (पर्वती), सुनील वाशिवाले (खडकवासला) आणि कृष्णा नाईक (पर्वती).
चिटणीसपदी नियुक्त झालेले पदाधिकारी : अविनाश खरात (पर्वती), गणेश शिंदे (हडपसर), मनोज कांबळे (पर्वती), रमेश गाडर (कॅन्टोन्मेंट), आशिष त्रिपाठी (शिवाजीनगर), अविनाश खरात (कसबा), हेमा परिहार (कॅन्टोन्मेंट), प्रवीण क्षीरसागर (कसबा), किसन यादव (पर्वती) आणि गणेश तावडे (खडकवासला).
कोषाध्यक्षपदी किरण ऊर्फ बंटी परदेशी (पर्वती) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.कार्यकारिणी सदस्य म्हणून बालाजी शेरला (खडकवासला), राहुल जाधव (शिवाजीनगर), विनायक वैष्णव (पर्वती), अश्विनी चिनी (पर्वती), रफिक शेख (कॅन्टोन्मेंट), प्रसाद परदेशी (शिवाजीनगर), युसुफ मोमिन (पर्वती), नरसिंग आडपत (वडगाव शेरी), ओंकार शिंदे (हडपसर), नजीर शेख (कसबा), वैभव मोरे (वडगाव शेरी), उदयन मिसाळ (खडकवासला) आणि संतोष अडगळे (पर्वती) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
धीरज घाटे आणि शासकीय योजना आघाडीचे अध्यक्ष गणेश शेरला यांच्या मार्गदर्शनाखाली ही आघाडी कार्यरत राहणार आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पुणे शहरात शासकीय योजनांबाबत जनजागृती वाढविण्यासह अधिकाधिक पात्र नागरिकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
















