‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ साठी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील मार्गाची पाहणी.

पुणे  : महापालिका आयुक्त श्री नवल किशोर राम, मा. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मा.अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) श्री. ओमप्रकाश दिवटे व मा. अप्पर पोलीस आयुक्त (वाहतूक) श्री मनोज पाटील यांच्याकडून ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ पुणे महानगरपालिका हद्दीतील संपूर्ण स्पर्धा मार्गाची पाहणी आज दि.०६/०१/२०२६ रोजी करण्यात आली.

पुणे शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे, त्यामुळे पुणे शहरात अनेक ऐतिहासिक पर्यटनस्थळे आहेत ती जगाच्या नकाशावर यावीत व त्या माध्यमातून तेथील अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना मिळावी आणि स्थानिक तरुणांना त्याच ठिकाणी रोजगार मिळावा या उद्देशाने या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. या स्पर्धेमुळे पुणे शहराचे तसेच भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित होणार आहे.

याप्रसंगी मा. महापालिका आयुक्त यांनी पुणे शहरातील ज्या भागातून स्पर्धा जाणार आहे, त्या सर्व भागांमधील रस्ते हे अत्यंत चांगल्या प्रकारचे उत्कृष्ट असावेत याबाबतचे काम सुरु असून ते लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आणि त्या रस्त्यांवर सायकल स्पर्धेबाबतचे रंगकाम ताबडतोब सुरु करण्याबाबतचे आदेश दिले आणि या सर्व रस्त्यांवर स्वच्छता करण्यात यावी असे आदेश दिले तसेच रस्त्यावरील अनधिकृत अतिक्रमणे तात्काळ काढण्यात यावीत याबाबतचे आदेश दिले.

सदर भेटीच्या वेळी खालील प्रमाणे अधिकारी उपस्थित होते.
. श्री.हिम्मत जाधव, पोलीस उपायुक्त, श्री अनिरुद्ध पावसकर, मुख्य अभियंता (पथ), श्री. माधव जगताप, उप आयुक्त (परि.क्र.१), श्री. अविनाश सपकाळ, उप आयुक्त (घनकचरा), डॉ. रमेश शेलार, मुख्य सुरक्षा अधिकारी, श्रीमती मनीषा शेकटकर, मुख्य अभियंता (विद्युत)

See also  ६८२४८ हजार रूग्णांनी घेतला प्रत्यक्ष लाभ - सनी विनायक निम्हण