खडकी : मोक्का गुन्ह्यातील दोन वर्षापासुन फरार असलेले दोन आरोपी खडकी पोलीस स्टेशनकडून गजाआड करण्यात आले.
आरोपी अतिक धर्मेंद्र गरुड, वय ३५ वर्षे, रा. एस. आर. ए.बिल्डींग, वारजे, पुणे, अनुज अविनाश वाघमारे, वय २३ वर्षे, रा. आंबेडकर चौक, औध रोड, हे गुन्हा घडलेबाबत पसार झाले होते. सदरचा गुन्हा दाखल झालेपासुन लपवुन वावरत होते. सदर आरोपीबाबत तांत्रीक तपास करुन बातमी प्राप्त केली असता, यातील आरोपी अतिक धर्मेंद्र गरुड, वय ३५ वर्षे, रा. एस. आर. ए. बिल्डींग, वारजे, पुणे, हा भेगडे वस्ती, तळेगाव दाभाडे, पुणे येथे तसेच अनुज अविनाश वाघमारे, वय २३ वर्षे, रा. आंबेडकर चौक, आँध रोड, हा उरळीकांचन, पुणे येथे राहणेस असलेबाबत खात्रीशीर बातमी पोलिसांना प्राप्त झाली सदर ठिकाणी खडकी पोलीस स्टेशनकडील तपास पथक प्रमुख श्री. आण्णा गुंजाळ, पोलीस उप निरीक्षक, पो.हवा.संदेश निकाळजे, पो. अंमलदार अतुल इंगळे, पो. अंमलदार ऋषिकेश दिघे, पो.अं. अनिकेत भोसले, पो.अं. प्रताप केदारी असे सदर ठिकाणी जावुन दोन्ही आरोपीना शिताफीने ताब्यात घेतले. सदर गुन्ह्याचा अधिक तपास सहा पोलीस आयुक्त सो, खडकी विभाग, श्री. विठ्ठल दबडे, हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त सो, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. हिंमत जाधव, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४, मा. विठ्ठल दबडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे शहर
यांचे मार्गदर्शनाखाली श्री. दिलीप फुलपगारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडकी पोलीस स्टेशन पुणे शहर, श्री.गजानन चोरमले, पोलीस निरीक्षक (गुन्हे), तपास पथक प्रमुख श्री. आण्णा गुंजाळ, पोलीस उप निरीक्षक, पो.हवा, ७३५६ संदेश निकाळजे, पो. अंमलदार अतुल इंगळे, पो. अंमलदार ऋषिकेश दिघे, पो.अं. अनिकेत भोसले, पो.अं. प्रताप केदारी यांनी केली आहे.