पाषाण : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधील सोमेश्वरवाडी–पाषाण परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य पथयात्रा काढण्यात आली. या पथयात्रेला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या पथयात्रेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार श्रीमती गायत्री मेढे–कोकाटे, श्री. बाबुराव चांदेरे, कु. पार्वती निम्हण तसेच अमोल बालवडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत येणाऱ्या निवडणुकीत आम्हा चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.
रॅलीदरम्यान परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन नागरी समस्या, पाणी, रस्ते, वाहतूक, स्वच्छता तसेच विकासाबाबतच्या अपेक्षा व अडचणी जाणून घेण्यात आल्या. नागरिकांनीही आपल्या प्रश्न मांडत सकारात्मक प्रतिसाद दिला.
या सर्व प्रश्नांचे प्रभावी निराकरण करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार साहेब यांच्या सक्षम व दूरदर्शी नेतृत्वाखाली आम्ही चारही उमेदवार कटिबद्ध, तत्पर आणि लोकाभिमुख भूमिका घेऊन काम करू, असे ठाम आश्वासन यावेळी देण्यात आले. पथयात्रेमुळे परिसरात निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून आले.
























