ना. चंद्रकांतदादांचा पाच महापालिकांमध्ये प्रचाराचा झंझावात ; एकूण १०० पेक्षा जास्त बैठका, ५० चौक सभा, १० पत्रकार परिषदांच्या माध्यमातून प्रचार

पुणे : नामदार चंद्रकांतदादा महापालिका निवडणुकीत प्रचाराचा झंझावात पाहायला मिळाला. १०० पेक्षा जास्त बैठका, घरोघरी भेटी ५० चौक सभांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षासाठी प्रचार केला. यामध्ये कोथरुड मधील चौक सभा ही लक्षवेधी ठरली.

राज्यातील २९ महापालिकांचा प्रचाराच्या तोफा आज थंडावला आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी महापालिकेची जबाबदारी ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे होती. यावेळी पहिल्या दिवसापासून ना. पाटील यांचा प्रचारात सक्रिय सहभाग होता. वेळोवेळी पदाधिकाऱ्यांसोबत बैठका, १०० पेक्षा जास्त बैठका, ५० चौक सभा आणि १० पत्रकार परिषदा यामाध्यमातून भारतीय जनता पक्षासाठी प्रचार केला.

या संपूर्ण काळातील कोथरुड मधील चौक सभा ही अतिशय लक्षवेधी आणि चर्चेत राहिली. कारण सभेसाठी कोणतीही व्यवस्था नसताना, गाडीच्या टपावर उभे राहुन त्यांनी नागरिकांना संबोधित केले होते.

See also  सोमेश्वर फाउंडेशन’ तर्फे 'पुणे आयडॉल’ स्पर्धा १९ मे रोजी सुरू; प्रसिद्ध गायिका सावनी रविंद्र यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन : माजी नगरसेवक सनी निम्हण यांची माहिती