सोमेश्वरवाडी : रामनदी स्वच्छता अभियानच्या वतीने सोमेश्वर वाडी येथील राम नदी कुंडावर दीपोत्सव साजरा करण्यात आला. दीपोत्सवाचे हे सातवे वर्ष असून यामध्ये पर्यावरण प्रेमी नागरिक सहभागी झाले होते.
दिवाळी पाडव्या निमित्ताने दरवर्षी प्रमाणे सोमेश्वर मंदिरा पाठीमागे कुंडावर हजारो दीप लावत दीपोत्सव साजरा केला. रामनदी कार्यकर्ते व नागरीक एकत्र येऊन स्वच्छता केली व दिवे लाऊन श्री. गणेश, गंगा आरती करण्यात आली कार्याची माहिती देण्यात आली.
हजारो दिव्यांच्या प्रकाशामध्ये सोमेश्वर वाडी येथील राम नदीवरील कुंड प्रकाशमान झाले होते. परिसरातील आकर्षक दिव्यांची रोषणाई पाहायला मिळत होती.