बालेवाडी : बालेवाडी वेल्फेअर असोसिएशन वतीने रमजान महिन्यानिमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी वाहतूक पोलीस निरीक्षक शफिल पठाण, असोसिएशनचे अध्यक्ष रमेश रोकडे, मोरेश्वर बालवडकर, शकील सलाटी, राम तारे, सिदप्पा माशाळकर, अमेय जगताप, इंद्रजीत कुलकर्णी, विकास कामत, अय्यर , सर्व पत्रकार तसेच सर्व सदस्य उपस्थित होते.
परिसरातील विकास व परिसराचे सामाजिक स्वास्थ्य विकसित करण्यासाठी सर्वच धार्मिक उत्सव आनंदाने साजरे करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. तसेच परिसरातील विविध विषयांवर देखील या निमित्ताने चर्चा करण्यात आली.
























