प्रभाग क्रमांक 34 मध्ये भाजपा उमेदवारांचा एकतर्फी विजय; हरिदास चरवड, कोमल नवले, जयश्री भूमकर, राजू लायगुडे विजयी

खडकवासलाः नऱ्हे, धायरी, वडगाव या प्रभाग क्रमांक 34 मध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवारांचा मोठ्या फरकाने निवडून येत एकतर्फी विजय झाला आहे. हरिदास चरवड, कोमल नवले, जयश्री भूमकर, राजू लायगुडे हे भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत.

हरिदास चरवड यांना 30217,  कोमल नवले यांना  29023, जयश्री भूमकर यांना 31350, तर राजू लायगुडे यांना 31838 इतकी मते मिळाली. प्रतिस्पर्धी बापूसाहेब पोकळे यांना 15689, नेहा भूपेंद्र मोरे यांना 13337,  तृप्ती प्रतीक पोकळे यांना 13896, तर शरद दबडे यांना 13926 इतकी मते मिळाली. हरिदास चरवड 14528, कोमल नवले 15686, जयश्री भूमकर 17454, राजू लायगुडे  17912 मतांनी विजयी झाले आहे. प्रभागात सर्व उमेदवार 15000 मतांच्या  मोठ्या फरकाने निवडून आले आहेत त्यामुळे विरोधक निस्तनाबूत झाल्याचे चित्र प्रभागांमध्ये आहे.

See also  कोथरुमधील सफाई कर्मचारी भगिनींनी आरोग्य उपक्रमांचा लाभ घ्यावा! नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची रक्षबंधनानिमित्त आवाहन