डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त रुग्णवाहिकेचे लोकार्पण

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त कॅटलिस्ट फाउंडेशन मार्फत रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला.
देवी कन्स्ट्रक्शनचे अध्यक्ष रवी मेहबूबानी यांच्या मार्फत ही रुग्णवाहिका कॅटलिस्ट फाऊंडेशनला देण्यात आली आहे.

फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने, माजी नगरसेवक प्रकाश ढोरे, भाजप शिवाजीनगर मतदार संघाचे सरचिटणीस आनंद छाजेड, कॅटलिस्ट फाउंडेशनच्या सचिव सौ. लक्ष्मीकांता माने यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमाला शिवाजीनगर भाजप युवा मोर्चा सरचिटणीस रोहित भिसे, खडकी भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अजित पवार, सुनील दैठणकर, जितेंद्र गायकवाड, नितीन गायकवाड, जे. नित्यानंद, राजाराम भिंगारे, शाम भालेराव, संतोष भिसे, रोहित लोखंडे, अरुण बागडी, संदीप चौरे, संकेत कांबळे, हिमांशू मुथय्या,संतोष टेकवडे, प्रतिक वाघमारे, ऋषभ काळे, अनिल चव्हाण, अनिल माने आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त डॉल्बी, फ्लेक्स यांसारख्या गोष्टींना फाटा देत आम्ही विविध सामाजिक उपक्रम प्रतिवर्षी राबवत असतो. यावर्षी ही बाबासाहेबांच्या जयंती निमित्त औंध रोड येथील समृध्दी भोरे हिला शैक्षणिक मदत दिली. तसेच औंधरोड, बोपोडी, चिखलवाडी येथील लोकांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. गरजू रुग्णांसाठी ही रुग्णवाहिका मोफत उपलब्ध असणार आहे. त्याचप्रमाणे मागील वर्षी अण्णाभाऊ साठेंच्या जयंती निमित्त प्रभागातील गरजू महिलांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप केले होते. अशाप्रकारे महापुरुषांना सामाजिक कामातून मानवंदना देण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.

यावेळी बोलताना प्र. कुलगुरू डॉ.सोनवणे म्हणाले, बाबासाहेबांच्या जयंती निमित्त इतर अनेक कार्यक्रम होत असतात मात्र कॅटलिस्ट फाऊंडेशन मार्फत करण्यात आलेला हा उपक्रम अनोखा आहे. रुग्णसेवा करण्याच्या उद्देशाने या रुग्णवाहिकेचे आज लोकार्पण करण्यात आले. या सारख्या कार्यक्रमामुळे लोकहिताचे खरे काम होऊन बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे चालवला जातो. याच माध्यमातून खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना आपण अभिवादन करतो आहोत.

See also  शासन आपल्या दारी’ राज्यस्तरीय अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साताऱ्यात होणार शुभारंभ मुंबई