आरंभ हौसिंग सोसायटीचा सामाजिक उपक्रमशील गणेशोत्सव साजरा

मोशी : आरंभ हाउसिंग सोसायटी मोशी-डुडूळगाव येथील आरंभ सांस्कृतिक मंडळाच्या वतीने यावर्षी आयोजित केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या परिसरामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये प्रथमच आरंभ हौसिंग सोसायटीच्या वतीने विविध व्याख्यानांचे आणि कला गुण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
गणेशोत्सव नुसताच साजरा न करता विचारांचे प्रबोधन व्हावे व सोसायटीतील लहान मुलांमध्ये विविध कला गुणांची आवड निर्माण व्हावी या हेतूने सोसायटीच्या आरंभ सांस्कृतिक मंडळाच्या वतीने दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी ‘जीवन सुंदर आहे’ या विषयावर प्रसिद्ध युट्युबर श्री गणेश शिंदे यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते.

तदनंतर त्याच दिवशी प्रसिद्ध सिने अभिनेते श्री गजानन पातुरकर यांचे ‘हास्य विनोदातून समाज प्रबोधन’ या विषयावर अतिशय मनमुराद असे सादरीकरण झाले. दिनांक 23 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते प्राचार्य प्रदीप कदम यांचे ‘आजचा गणेशोत्सव आणि समाज प्रबोधन’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. दिनांक 24 सप्टेंबर रोजी एकपात्री कलाकार प्रा. मारुती करंडे यांचे ‘धमाल एका लग्नाची’ ह्या 81 कलाकारांच्या आवाजातून सादर होणारा कला आविष्कार सादर करण्यात आला. तसेच या दिवशी दुपारी सत्यनारायण पूजा आणि संध्याकाळी सर्व गणेशभक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 25 सप्टेंबर रोजी सोसायटीच्या गणेशोत्सवामध्ये ‘विनोदी हास्य कवी संमेलनाचे’ आयोजन करण्यात आले होते.या हास्य कवी संमेलनाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध कवी संतोष गाढवे यांनी केले तर संमेलनामध्ये देवेंद्र गावंडे,ज्ञानेश्वर चौधरी,विठ्ठल मोरे,सचिन चतुर,बाबाजी शिंदे,मधुकर गिलबिले,आयोजक प्रा.भास्कर घोडके आदी कवीनी सहभाग घेतला.दिनांक 26 सप्टेंबर रोजी फनफेअर बरोबरच सोसायटी मधील छोट्या मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नृत्य स्पर्धा आणि इतर काही स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते. विविध स्पर्धांमधून निवड झालेल्या प्रथम, द्वितीय, आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच, दिनांक 27 सप्टेंबर रोजी डॉक्टर माया मानकर आणि ऍडवोकेट कुणाल राक्षे निर्मित ‘सूनहरे पल’ या सदाबहार हिंदी गीतांच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रसिकांनी सुचवलेल्या अनेक फर्माईशी गायकांनी सादर केल्या. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमाची सांगता पसायदान प्रचारक आणि गोसेवक श्री मुबारक भाई शेख यांच्या ‘पसायदान’ या व्याख्यानाने झाली.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मोशी आणि डुडूलगाव परिसरामध्ये प्रथमच अशा प्रकारचा नाविन्यपूर्ण उपक्रम आरंभ हाऊसिंग सोसायटीच्या वतीने केला गेल्यामुळे परिसरातील विविध सोसायटींच्या वतीने आरंभ हाउसिंग सोसायटीचे कौतुक होताना दिसत आहे.
हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सोसायटीचे चेअरमन अनिल उपाध्ये, सचिव सुहास कदम तसेच सांस्कृतिक समिती सदस्य प्राध्यापक भास्कर घोडके, गोविंद लिंगायत, मिलिंद सोनार,माणिक नलगे,योगेश पवार,अण्णासाहेब माने,संतोष माळी,देशमुख काका,निलेश खैरनार,विठ्ठल निकम,निलेश काळे,निलेश पाटील,अनिल पवार,माने काका,सतीश डूचे,सुभाष माने,महेंद्र शिंदे,विलास दौंडकर,सुरेश ढोबळे,मनोज शेळके,देवानंद ढगे, प्रणाली घोडके ,रोहिणी लिंगायत,झीनल सोनार ,सुप्रिया चव्हाण,पूनम पवार,आदींनी विशेष परिश्रम घेऊन या कार्यक्रमाला हातभार लावले.

See also  शिवाजीनगर हिंजवडी मेट्रोमुळे वाहतुकीचा सक्षम पर्याय उपलब्ध - मुरलीधर मोहोळ