खडकवासला ः अत्यंत चुरशीच्या झालेल्या शिवणे, खडकवासला आणि धायरी पार्ट या प्रभाग क्रमांक 33 मध्ये भारतीय जनता पार्टीचे धनश्री कोल्हे, सुभाष नाणेकर तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनिता इंगळे आणि सोपान उर्फ काका चव्हाण विजयी झाले आहेत.
धनश्री कोल्हे यांना 32685 सुभाष नाणेकर यांना 25556,
अनिता इंगळे यांना 31476, तर काका चव्हाण यांना 29944 इतकी मते मिळाली. प्रतिस्पर्धी रश्मी घुले यांना 27798, ममता दांगट यांना 23712, संदीप मते यांना 25017, तर किशोर पोकळे यांना 26594 इतकी मते मिळाली. धनश्री कोल्हे 4887, सुभाष नाणेकर 539, अनिता इंगळे 7712, काका चव्हाण 3350 मतांनी विजयी झाले आहे. प्रभागात अनिता इंगळे सर्वात जास्त मताधिक्याने विजयी झाल्या तर सुभाष नाणेकर सर्वात कमी मतांनी निवडून आले आहेत.
कोंढवे धावडे, उत्तमनगर, शिवणे, खडकवासला, धायरी, नांदेड ही नुकतीच महापालिका मध्ये समाविष्ट झालेली गावे आहेत. अनेक वर्षांपासून समाजकार्यात कार्यरत असल्यामुळे नागरिकांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी आता माझी आहे.
– सुभाष नाणेकर
नवनिर्वाचित नगरसेवक




























