उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची पुणे व बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या शासन निर्णयानुसार उपमुख्यमंत्री सौ. सुनेत्रा अजित पवार यांची पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा अधिकृत शासन निर्णय दि. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर करण्यात आला.

यापूर्वी दिवंगत अजित आनंतराव पवार हे पुणे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांच्या दुर्दैवी निधनामुळे दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री पद रिक्त झाले होते. त्या पार्श्वभूमीवर शासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे.

पुणे जिल्हा हा राज्याचा शैक्षणिक, औद्योगिक आणि आयटी केंद्रबिंदू असून, बीड जिल्हा हा कृषी, पाणीटंचाई आणि ग्रामीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा जिल्हा आहे. या दोन्ही जिल्ह्यांचा समतोल व सर्वांगीण विकास साधण्यासाठी ही नियुक्ती महत्त्वाची ठरणार आहे.

या नियुक्तीचे पुणे व बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी व नागरिकांनी स्वागत केले असून, विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

See also  विवाहसोहळ्याचा खर्च रामनदी आणि भवताल  पुस्तकासाठी देण्याचा अनोखा संकल्प; तेजस पवार आणि प्रतिक्षा थोपटे यांच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक