श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सामुदायिक सूर्यनमस्कार कार्यक्रम उत्साहात संपन्न

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित “सामुदायिक सूर्यनमस्कार” कार्यक्रम अत्यंत उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडला. परिसरातील नागरिक, युवक-युवती आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत आरोग्य व एकजुटीचा संदेश दिला.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून बिपिन नरोटम पाटील (शिवछत्रपती पुरस्कार विजेते, खो-खो पटू) तसेच विजय मांजरे (व्हॉलीबॉल राष्ट्रीय खेळाडू) यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोोभा वाढवली. त्यांनी आपल्या मनोगतातून नियमित व्यायाम, शिस्त आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित केले.

तसेच नगरसेवक मनीषा बुटाला, रूपाली पवार, ज्योस्ना कुलकर्णी, अल्पना वर्पे, दिनेश माथवड तसेच वासंती जाधव यांनी उपस्थित राहून आरोग्य, एकात्मता आणि समाजहित याविषयी प्रेरणादायी विचार मांडले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उमेश धोंडीराम पंढरे (अध्यक्ष, थोरात गार्डन योग मित्र मंडळ) यांचे नेतृत्व, नियोजन व मार्गदर्शन मोलाचे ठरले. तसेच थोरात गार्डन योग मित्र मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी दिलेल्या सहकार्यामुळे कार्यक्रम सुरळीत व भव्य स्वरूपात पार पडला. या उपक्रमातून निरोगी समाज आणि संघटित शक्तीचा संदेश देण्यात आला. भविष्यातही समाजहिताचे असे उपक्रम अधिक जोमाने राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

See also  औंध आरोग्य विभागाकडून बाणेर पाषाण टेकडीवरील १७०० किलो प्लास्टिक दारूच्या बाटल्या स्वच्छता मोहिमेत जमा