कोंढवे धावडे येथे नदीपात्रात राडारोडा टाकणाऱ्यांवर कारवाई; ८ गाड्या व जेसीबी जप्त, २.२५ लाखांचा दंड

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या Pune Municipal Corporation घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत आज कोंढवे धावडे येथे नदीपात्रात अनधिकृतपणे राडारोडा टाकणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली.

उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) अविनाश सपकाळ, उपायुक्त परिमंडळ ३ प्रसाद काटकर, सहाय्यक आयुक्त प्रज्ञा पोतदार तसेच वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.

या कारवाईदरम्यान नदीपात्रात बांधकामाचा राडारोडा टाकताना ८ गाड्या व १ जेसीबी पकडण्यात आली. संबंधित वाहनांवर प्रत्येकी २५,००० रुपयांप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली असून एकूण २,२५,००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

यावेळी वरिष्ठ आरोग्य निरीक्षक संदीप चव्हाण, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक नितीन लोखंडे, आरोग्य निरीक्षक वैभव घटकांबळे, प्रदीपकुमार राऊत, कविता शिसोलीकर, रूपाली शेडगे, प्रशांत दामले तसेच मुकादम अक्षय लांडगे, सेवक अशोक आंधळे आणि वाहन चालक सचिन अडसूळ उपस्थित होते.

नदीपात्र व सार्वजनिक ठिकाणी राडारोडा अथवा कचरा टाकणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी पर्यावरण संरक्षणासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

See also  प्रत्येक महिलेने योगाभ्यास करणे गरजेचे नामदार चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन