पाषाण : पुणे शहर भाजपा सचिव श्री राहुल कोकाटे यांचा वतीने माजी पंतप्रधान,भारतरत्न, श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांचा जयंती निमित्त सेवा सप्ताह आयोजित करण्यात आला.या निमित्त पाषाण,सुतारवाडी,सुस रोड,सोमेश्वरवाडी परिसरातील नागरिकांसाठी नविन मतदार नोंदणी/दुरुस्ती,नविन रेशनकार्ड/दुरुस्ती शिबिर,भाजपा सदस्य नोंदणी अभियान दि.२५ ते २९ डिसेंबर दरम्यान राबवण्यात येत आहे. पहिल्या दिवशी परिसरातील २०० नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.
या शिबिराचे उद्घाटन फेस्कॉन महाराष्ट्राचे खजिनदार श्री रत्नाकर मानकर,श्री वाकेश्वर जेष्ठ नागरिक संघाचे श्री रघुनाथ उत्पात,जेष्ठ समाजसेवक श्री रविंद्र मुनोत यांचा शुभस्ते करण्यात आले,यावेळी श्री उत्तम जाधव,श्री तपस कुमार,श्री सुभाष भोळ,श्री प्रविण आमले,सौ शोभा शेट्टी उपस्थित होते. भाजपा नेत्या सौ मयुरी कोकाटे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.