सुस–म्हाळुंगे परिसरातील ड्रेनेज DPR कामाचा नगरसेविका मयुरी कोकाटे यांनी घेतला आढावा
अमृत 2.0 योजनेअंतर्गत ड्रेनेज लाईन व STP प्रकल्पाला गती

पुणे : नव्याने समाविष्ट सुस व म्हाळुंगे गावांमधील ड्रेनेज समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने ड्रेनेज लाईनच्या DPR (Detailed Project Report) वर सुरू असलेल्या कामाचा आढावा आज नगरसेविका मयुरी ताई राहुल कोकाटे यांच्या वतीने घेण्यात आला.

केंद्र शासनाच्या अमृत 2.0 योजनेअंतर्गत सुस व म्हाळुंगे परिसरात ड्रेनेज लाईन तसेच STP (सांडपाणी प्रक्रिया केंद्र) विकसित करण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत DPR नुसार सुरू असलेल्या कामाची सविस्तर पाहणी करण्यात आली.

या वेळी परिसराचा सखोल विचार करून नव्याने ड्रेनेज लाईन कोणत्या भागात करणे आवश्यक आहे, याबाबत सूचना देण्यात आल्या. काही ठिकाणी मोठ्या व्यासाच्या ड्रेनेज लाईनची गरज असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच भविष्यातील नागरीकरण लक्षात घेऊन सुस–म्हाळुंगे परिसरातील ड्रेनेज व्यवस्था अधिक सक्षम, सुरळीत व दीर्घकालीन स्वरूपात कार्यान्वित होण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा DPR मध्ये समाविष्ट करण्याबाबत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

या आढावा बैठकीस राहुलदादा कोकाटे, ड्रेनेज विभागाचे अधीक्षक अभियंता सुहास अल्बर, ज्युनिअर अभियंता अजय फाळे, प्रायमाचे आनंद अंदुरे, पाटील कन्स्ट्रक्शनचे मयूर कणके, भारतीय जनता पार्टीचे नेते सुहास तात्या भोते, युवा मोर्चाचे अध्यक्ष अनिकेत चांदेरे तसेच सामाजिक कार्यकर्ते नामदेव चांदेरे उपस्थित होते.

या प्रकल्पामुळे सुस–म्हाळुंगे परिसरातील ड्रेनेज व्यवस्था अधिक सक्षम होऊन नागरिकांना भविष्यातील समस्या टाळण्यास मोठा दिलासा मिळणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

See also  जन संघर्ष समितीच्या वतीने अध्यक्ष ॲड. रवींद्र रणसिंग यांनी  खासदार सुप्रियाताई सुळे यांना जातीनिहाय जनगणना आणि आरक्षण मर्यादा ८०% करावी ह्या मागणीचे निवेदन देण्यात आले