बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा अजित पवार यांचा विक्रमी विजय

बारामती : बारामती मतदार संघात झालेल्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा अजित पवार यांनी तब्बल २ लाख १८ हजार ९७० मतांच्या प्रचंड मताधिक्याने विजय मिळवत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या विजयामुळे त्या राज्यातील सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेल्या उमेदवार ठरल्या आहेत.

याआधी अजित पवार यांनी बारामतीतून सुमारे १ लाख ६८ हजार मतांचे मताधिक्य मिळवले होते. त्या तुलनेत सुनेत्रा पवार यांनी मोठी झेप घेत विक्रमी आघाडी मिळवली आहे.

या विजयाचा कार्यकर्त्यांकडून मोठ्या उत्साहात जल्लोष करण्यात आला. मात्र सुनेत्रा पवार यांनी संयमित भूमिका घेत हा दिवस आनंदोत्सव साजरा करण्याचा नसल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बारामती येथे जय पवार यांच्या नेतृत्वात अजित दादा यांच्या स्मृतीस्थळाला भेट देत अभिवादन केले व पुष्प अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली.
बारामतीतील या निकालामुळे राज्याच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

See also  मुळशी तालुक्यातील मुठा खोऱ्यात पाणीटंचाई तीव्र; बंधारे कोरडे, शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा;टेमघर धरणातून पाणी सोडण्याची मागणी