पुणे मनपाच्या स्मशानभूमीतील पुरवठा दाराकडून शेणाच्या गौर्या लाकडे घेतली नाहीत म्हणून मोफत लाकडे पुरवणाऱ्यावर तलवारीने वार

पुणे : सुतारवाडी परिसरात स्मशान भूमीतील गौर्या व लाकडे माझ्याकडून का घेतली नाहीत अशी विचारणा करत एका व्यक्तीवर तलवारीने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी तिघांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई Pune City Police अंतर्गत Baner Police Station येथे करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन उत्तम रणपिसे (वय ३५, रा. सुतारवाडी, बाणेर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ११ मार्च २०२६ रोजी दुपारी त्यांच्या मित्र रोहित आडुळकर यांच्या चुलत्याचे निधन झाल्याने अंत्यविधीसाठी त्यांनी शेणाच्या गौर्या व लाकूडफाटा असे अंत्यविधीचे साहित्य स्मशानभूमीच्या बाहेरून देण्यात आले होते. आरोपी अजय माकर याचा सुतारवाडी येथे स्मशानभूमी मध्ये अंत्यविधीसाठी शेणाच्या गौर्या व लाकडे पुरवण्याचा व्यवसाय आहे. अंत्यविधीसाठी मोफत लाकडे का दिली असे सचिन रणपिसे याला विचारत त्याच्यावर तलवारीने वार करण्यात आले.

मोफत गौर्या व लाकडे पुरवल्याच्या पार्श्वभूमीवर आरोपी अजय माकर याने रणपिसे यांना फोन करून सुतारवाडी येथील विठ्ठल मंदिराजवळ बोलावले. त्यानंतर त्यांना कारमध्ये बसवून शिवशक्ती चौकाजवळ बालम सुतार यांच्या कार्यालयासमोर नेण्यात आले. तेथे आरोपी अजय माकर व त्याच्या एका साथीदाराने त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली.यानंतर अजय माकर हा कारमधून तलवार घेऊन बाहेर आला आणि रणपिसे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात सचिन रणपिसे यांच्या खांद्यावर वार होऊन ते गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांनी तेथून सुटका करून घेत पळ काढला व फोनवरून कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी खाजगी  रुग्णालयात दाखल करण्यात आले. व त्यानंतर पुढील उपचारासाठी ससून येथे पाठवण्यात आले.

या घटनेनंतर रणपिसे यांनी बाणेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अजय माकर व त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बाणेर पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू आहे.

See also  नंबर प्लेटमध्ये छेडछाड, बनावटगिरी रोखण्यासाठी ‘एचएसआरपी’अनिवार्य

पुणे महानगरपालिकेच्या स्मशानभूमी मध्ये अंत्यविधीचे साहित्य पुरवण्यावरून गंभीर स्वरूपाचे गुन्हे होत असल्याने स्मशानभूमी परिसरामध्ये मृतांच्या नातेवाईकांची लूट केली जात आहे का याची देखील चौकशी करण्याची मागणी या निमित्ताने नागरिक करत आहेत.