जागतिक मधुमेहदिन आणि राष्ट्रीय बालदिनानिमित्त शनिवारी; डॉ. रवींद्र नांदेडकर ‘बालमधुमेह’ या विषयावर मोफत मार्गदर्शन

पुणेः- दिनांक १४ नोव्हेंबर रोजी साजरा होत असलेला जागतिक मधुमेहदिन आणि राष्ट्रीय बालदिनाच्या पार्श्वभूमीवर अनुयश आरोग्य प्रतिष्ठानतर्फे शनिवार दिनांक ११ नोव्हेंबर २०२३ रोजी ‘मधुसंवाद’ या कार्यक्रमात राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध मधुमेह संशोधक डॉ. रवींद्र नांदेडकर ‘बालमधुमेह’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे, अशी माहिती अशी माहिती अनुयश आरोग्य प्रतिष्ठानच्या सचिव रूपाली नांदेडकर आणि विश्वस्त विलास नेवपूरकर यांनी कळविली आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान एमआयटी कला, डिझाईन व तंत्र विद्यापीठाचे परिक्षा नियंत्रक डॉ. ज्ञानदेव नीलवर्ण भूषविणार आहेत.


हा कार्यक्रम शनिवार दिनांक ११ नोव्हेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ५.०० (पाच) वाजता, दुसरा मजला, पत्रकार भवन, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे येथे होणार असून सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. यावेळी उपस्थित श्रोत्यांना डॉ. रवींद्र नांदेडकर यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळणार असून यावेळी उपस्थित सर्वांची मोफत रक्त शर्करा तपासणी देखील करण्यात येणार आहे. या मोफत कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन अनुयश आरोग्य प्रतिष्ठानच्या सचिव रूपाली नांदेडकर आणि विश्वस्त विलास नेवपूरकर यांनी केले आहे.

See also  पुणे महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयात वैद्यकीय उपचारांची फी ऑनलाईन पद्धतीने देण्याची सुविधा उपलब्ध करवी