औंध–बाणेर परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाई; हातगाड्या, वाहन व साहित्य जप्त

पुणे : Pune Municipal Corporation च्या औंध–बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत १२ मार्च २०२६ रोजी अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. औंध गाव, खडकी, दापोडी, मुरकुटे गार्डन बाणेर, बिटेवाइज बिल्डिंग परिसर, डीमार्ट बाणेर, महाळुंगे बालेवाडी स्टेडियम परिसर तसेच दसरा चौक आयटीआय रोड येथे ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईदरम्यान अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या हातगाड्या, पथारी व इतर साहित्य जप्त करण्यात आले. अतिक्रमण निर्मूलन पथकाने एकूण ५ हातगाड्या, ४ काउंटर, ३२ पथाऱ्या, ४३ इतर साहित्य, ४ व्यावसायिक सिलेंडर तसेच १ व्यावसायिक वाहन जप्त केले.

कारवाईसाठी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, बिगारी सेवक तसेच अतिक्रमण विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते. यामध्ये अतिक्रमण निरीक्षक राकेश काची, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक नितीन खैरनार, अनिल देशमुख, तसेच माध्यवर्ती पथकातील सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक वैभव जगताप व अरविंद बोरकर यांनी सहभाग घेतला.

ही कारवाई अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपआयुक्त सोमनाथ बनकर व महापालिकेचे सहाय्यक आयुक्त विजय नायकल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अनधिकृत अतिक्रमणांवर पुढेही नियमितपणे आणि वारंवार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण निरीक्षक राकेश काची यांनी दिली. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून रस्ते व सार्वजनिक जागा मोकळ्या झाल्यामुळे वाहतुकीला दिलासा मिळणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

See also  भाजपाचे इच्छूक उमेदवार वाऱ्यावर - मुलाखती नव्हे तर थट्टा केल्याचा संताप कात्रज परिसरात अधिक नाराजी