पशुधन उत्पादनाच्या आरोग्य आणि विस्तारासाठी पशुसखी केंद्राचा शुभारंभ

पुणे :  केंद्र शासनाने सूरू केलेल्या  पशुसंवर्धन विभाग व पशुपालक यांच्यामध्ये ग्रामस्तरावर पहिला दुवा असलेल्या आणि पशुधन उत्पादनाच्या आरोग्य आणि विस्तारासाठी  पथदर्शी असलेल्या ‘ए-हेल्प कार्यकर्ता’ (पशुसखी) या पथदर्शी कार्यक्रमाचा  पशुसंवर्धन आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे आज शुभारंभ करण्यात आला.

या कार्यक्रमास  केंद्राचे सहआयुक्त पशुसंवर्धन डॉ.राजेंद्र बांबल, राष्ट्रीय ग्रामीण जिवनोन्नती अभियानाचे डॉ. विवेक कुंज,  केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयाचे राहुल नायर, आनंद, गुजरातचे  एनडीडीबीचे मुख्य प्रशिक्षण अधिकारी  प्रकाश अहिरराव, सहआयुक्त परमेश्वर राऊत यांच्यासह  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियानाचे, पशुसंवर्धन विभागातील व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पशुसंवर्धन विभाग व पशुपालक यांच्यामध्ये ग्रामस्तरावर पहिला दुवा असलेल्या ए-हेल्प कार्यकर्ता (पशुसखी) यांना प्रशिक्षण देवून त्यांना अर्थार्जनचा अतिरिक्त स्रोत निर्माण करणे व याद्वारे पशुसंवर्धन विभागास मदत करण्यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला  राज्यभरातून ५०० पेक्षा अधिक पशुसखी उपस्थित होत्या.  यावेळी श्री. दिवेगावकर यांनी पशुसंवर्धन विभागामध्ये पशुसखी संकल्पनेचे महत्व व कार्यपद्धती याबाबत मार्गदर्शन केले. श्री. बांबल, श्री. राऊत व श्री. नायर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.

See also  बँक ऑफ महाराष्ट्रच्या ९० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या  रक्तदान शिबिरात १३६ रक्तदात्यांनी केले रक्तदान