भारती विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतनमध्ये टेक्नो-इनोव्हा-२०२६ तांत्रिक शोधनिबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

पुणे : भारती विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतन येथे संपन्न झालेल्या “टेक्नो-इनोव्हा-२०२६ तांत्रिक शोधनिबंध स्पर्धेचा” पारितोषिक वितरण समारंभ नुकताच दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महिंद्रा अक्सेलोचे बिझनेस हेड मा. श्री. लक्ष्मण महाले उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई,  विभागीय कार्यालय, पुणे चे उपसचिव मा. श्री. व्ही. एम. कोल्हे यांनी भूषविले.

संस्थेचे उपप्राचार्य श्री. अमितराव पाटील यांनी संस्थेची शैक्षणिक परंपरा, मानांकन प्राप्त अभ्यासक्रम, उद्योगसंलग्न व विद्यार्थीभिमुख उपक्रम यांची माहिती दिली व तांत्रिक स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार करण्याची क्षमता विकसित होते. आजच्या कॉर्पोरेट युगात तांत्रिक ज्ञानासोबतच ते प्रभावीपणे सादर करणे किती महत्त्वाचे आहे, यावर त्यांनी भर दिला.
विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीचे कौतुक करताना, “आजच्या स्पर्धात्मक युगात उद्योगांना केवळ पदवीधर नकोत, तर ज्यांच्याकडे तांत्रिक समस्या सोडवण्याचे कसब आहे अशा तरुणांची गरज आहे. विद्यार्थ्यांनी तांत्रिक शोधनिबंधांच्या माध्यमातून मांडलेले विचार भविष्यातील औद्योगिक क्रांतीची नांदी आहेत. या स्पर्धेमुळे ग्रामीण व शहरी पार्श्वभूमीतून येणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वतःची क्षमता सिद्ध करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. आत्मविश्वास ठेवा, प्रामाणिक प्रयत्न करा, प्रत्येक प्रेझेन्टेशनमधून काहीतरी नवे शिका, आणि निकाल काहीही असो, आजचा दिवस आपल्या व्यक्तिमत्त्वात आणि करिअरमध्ये नक्कीच महत्त्वाचा टप्पा ठरेल. असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्री. लक्ष्मण महाले, बिझनेस हेड, महिंद्रा अक्सेलो यांनी पारितोषिक वितरण प्रसंगी बोलताना केले.

अध्यक्षीय भाषणात मा. श्री. व्ही. एम. कोल्हे यांनी भारती विद्यापीठाचे संस्थापक मा. डॉ. पतंगराव कदम यांच्या कार्याचा आढावा घेताना सामान्य कुटुंबातून येऊन सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवणारे नेतृत्व हे केवळ सत्तेसाठी नव्हे, तर समाजाच्या कल्याणासाठी झटणारे असते ते कदम साहेबांनी उभारलेल्या कार्यातून आपल्याला दाखवून दिले आहे, सरकारी नोकऱ्या सगळ्यांना सामावून घेऊ शकत नाही, तुमच्यातूनच उद्याचे कदम साहेबांसारखे नेतृत्व निर्माण व्हायला हवे असे नमूद करताना, स्पर्धा विद्यार्थ्यांना त्यांचे तांत्रिक ज्ञान, नाविन्यपूर्ण विचार आणि प्रेझेंटेशन कौशल्ये प्रदर्शित करण्याची संधी देते, ज्यामुळे संशोधनात्मक विचार, तांत्रिक जागरूकता आणि व्यावसायिक संवादकौशल्ये विकसित होतात. या मंचामुळे देशभरातील पॉलिटेक्निक विद्यार्थी एकमेकांशी स्पर्धा करताना परस्परांपासून शिकतात, नवे तांत्रिक ट्रेंड समजून घेतात आणि व्यावसायिक संवादकौशल्य विकसित करतात. भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार संशोधन क्रियाकलापांवर भर देत असल्याने अशा स्पर्धा तरुण तंत्रज्ञांना संशोधनाकडे प्रेरित करतात, ज्यामुळे “स्थानिक राहा, जागतिक कृती करा” हे ध्येय साकार होते, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई अशा उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन देते, आम्ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच कटिबद्ध आहोत कारण यामुळे विद्यार्थ्यांचे एकूण व्यक्तिमत्त्व विकास होतो आणि तांत्रिक प्रगतीशी जोडले जातात. तांत्रिक शोधनिबंध स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सादरीकरण कौशल्य आणि संशोधनाची आवड निर्माण होते, जी त्यांच्या करिअरसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

See also  कांदा उत्पादकांचे नुकसान होऊ नये यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांशी बोलणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

स्पर्धेचा निकाल:
या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावरील विविध तंत्रनिकेतनांमधून १०० पेक्षा जास्त  शोधनिबंध सादर करण्यात आले होते. तज्ज्ञ परीक्षकांनी केलेल्या मूल्यमापनानंतर विजेत्यांची निवड करण्यात आली.
विभाग १ : सिव्हील इंजिनीअरिंग
• प्रथम क्रमांक: ओंकार चव्हाण, बी.व्ही. जे. एन.आय.टी, पुणे
• द्वितीय क्रमांक: मयुरेश सनेर, अनिष्ट खपले], वाय. बी. पॉलीटेक्निक
विभाग २ : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग
• प्रथम क्रमांक: फहाद शेख, सिद्धेश्वर ओझा, बी.व्ही. जे. एन.आय.टी, पुणे
• द्वितीय क्रमांक: सर्वेश पोवार, श्रेया सावंत एम एम पॉलीटेक्नीक
विभाग ३: कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी
• प्रथम क्रमांक: अबोली शिंदे, बी.व्ही. जे. एन.आय.टी, पुणे
• द्वितीय क्रमांक: आर्यन जाधव, एस.व्ही.सी.पी, पुणे
विभाग ४: मेकॅनिकल इंजिनिअरिंग
• प्रथम क्रमांक: साक्षी कुंजीर, नेहा नागटिळक, बी.व्ही. जे. एन.आय.टी, पुणे
• द्वितीय क्रमांक: ब्युटी चौधरी, स्नेहा महानवर, जे.एस.पी.एम.एस.
• उत्तेजनार्थ: अदिती जाधव, शासकीय तंत्रनिकेतन, पुणे
पुणे विभाग ५: इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन इंजिनिअरिंग
• प्रथम क्रमांक: देवांग चौधरी, बी.व्ही. जे. एन.आय.टी, पुणे
• द्वितीय क्रमांक: जान्हवी अरबोले, पी.सी.पी. पुणे
विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमामध्ये टेक्नो-इनोव्हा-२०२६ चा अहवाल विद्यार्थी प्रतिनिधी कु. समृद्धी कदम हिने सादर केला, स्पर्धेच्या सहनिमंत्रक सौ. जागृती कडू यांनी पारितोषिकांचे वाचन केले. यावेळी तंत्रनिकेतनचे प्रभारी प्राचार्य श्री. ऋषिकेश देशमुख, सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अबोली शिंदे, कु. हेमराज सैंदाणे यांनी केले, तर आभार स्पर्धेचे सहनिमंत्रक श्री. विद्याभूषण उपाध्ये यांनी मानले.