PMC ची केबल SOP अजून कागदावरच; पुणेकरांच्या जीवाशी खेळ सुरू – आम आदमी पार्टीचा आरोप

पुणे : पुणे मनपा Pune Municipal Corporation (PMC) प्रशासनाने 21 एप्रिल 2026 रोजी शहरातील ओव्हरहेड केबल्स शिस्तबद्ध करून टप्प्याटप्प्याने भूमिगत करण्यासाठी SOP तयार करण्याबाबत बैठक घेतल्याची माहिती जाहीर केली होती. मात्र, प्रत्यक्षात शहरात आजही मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर ओव्हरहेड केबल्सचे जाळे कायम असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने PMC प्रशासनावर तीव्र टीका करत “धोरणे कागदावर आणि प्रत्यक्षात शून्य कारवाई” अशी परिस्थिती असल्याचा आरोप केला आहे. PMC च्या स्वतःच्या माहितीनुसार, शहरातील केबल्सचे सर्वेक्षण अद्याप पूर्ण झालेले नाही. तसेच अनेक ठिकाणी अनधिकृत केबल्सचे जाळे अस्तित्वात असून SOP अद्याप अंतिम टप्प्यात आहे व त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. त्यामुळे रस्त्यांवर लोंबकळणाऱ्या वायरमुळे अपघात, विजेचे धोके आणि नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.

AAP च्या मते, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे केबल माफियांना मोकळे रान मिळाले असून परिस्थिती अधिक गंभीर होत चालली आहे.

आम आदमी पार्टीच्या प्रमुख मागण्या:
बेकायदेशीर ओव्हरहेड केबल्स तात्काळ काढाव्यात
SOP अंतिम होईपर्यंत अंतरिम स्वरूपात कडक कारवाई करावी
संबंधित अधिकारी व केबल ऑपरेटर यांच्यावर गुन्हे दाखल करावेत
संपूर्ण शहरातील केबल नेटवर्कचे सर्वेक्षण तात्काळ पूर्ण करून अहवाल जाहीर करावा
नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने PMC प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

See also  बालेवाडीत "जन आशीर्वाद मेळाव्यात"  हजारोंच्या गर्दीसमोर सर्वसामान्यातील पाहुणे; चंद्रकांत दादा पाटील यांच्या कार्यपद्धतीवर बालवडकर यांची नाराजी