औंध : फुलोरा फाउंडेशन तर्फे औंध येथील इंदिरा गांधी प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या ३१६ विद्यार्थ्यांसाठी वह्या आणि पेन यांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी फुलोरा फाउंडेशन संस्थेच्या विश्वस्त सौ. प्रिती शिरोडे, संचालक श्री. देवराज लीगाडे, देणगीदार श्री. मिलिंद जाळींद्रे, सौ. उषा देशपांडे, मनीषा नंदी, ऍड. माणिक कराड, फुलोराचे सभासद सौ. वृषाली वाणी, श्री. विजय माने उपस्थित होते.शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता ठानगे, शिक्षिका आणि विद्यार्थ्यांनी फुलोरा फाउंडेशनचे आभार मानले.
फुलोरा फाउंडेशन तर्फे शालेय साहित्य वाटप करण्याचे हे आठवे वर्ष आहे. उद्या फुलोरा फाउंडेशन तर्फे कर्वे रोड येथील प्रेमलीला ठाकूरदास या मुलींच्या शाळेत शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम होईल आणि परवा खडकी येथील आलेगावकर शाळेत शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम होईल. यंदा एकूण ५०१ विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप केले जाईल असे विश्वस्त सौ. प्रिती शिरोडे यांनी सांगितले.