हिंदुराष्ट्राचे डोहाळे लागलेल्यांनी नेपाळचा आदर्श घ्यावा – सुनील माने

पुणे : नेपाळच्या नवनिर्वाचित सरकारने हजारो वर्षे अन्याय- अत्याचार सहन केलेल्या दलितांची माफी मागण्याचा निर्णय घेतला आहे. नेपाळ हे जगातले एकमेव हिंदू राष्ट्र आहे. भारतात हजारो वर्षांपासून दलित, महिला आणि ओबीसी यांच्यावर अमानुष अत्याचार केले गेले. नेपाळच्या कृतीचा भारतातही नव्याने हिंदूराष्ट्राचे डोहाळे लागलेल्यांनी आदर्श घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तसेच प्रवक्ते सुनील माने यांनी केली आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले, हजारो वर्षे जात –धर्माच्या नावाने दलीतांवर अन्याय अत्याचार केला म्हणून नेपाळच्या नवीन सरकारने आता दलीतांची माफी मागायची ठरवले आहे. भारतातही हजारो वर्ष दलित, ओबीसी आणि महिला या घटकांवर अन्याय अत्याचार केले गेले. आपल्या देशातही आता नव्याने हिंदू राष्ट्राचे डोहाळे लागलेले अनेक लोक तयार होत आहेत. त्यांना या जात आणि धर्मव्यवस्थेबद्दल माहिती आहे का ? त्यातून केले गेलेल्या अन्याय – अत्याचाराची माहिती आहे का ? त्या सर्वांनी पहिल्यांदा याची माहिती घ्यावी. हिंदू राष्ट्राचे डोहाळे लागलेल्या लोकांनी दलित समुदायाला अनेक वर्ष छळले. त्यांना शिक्षण मिळू दिल नाही, पाणी मिळू दिल नाही तसेच त्यांना समान संधी ही मिळू दिली नाही. याबद्दल त्या समुदायाने आता दलीत, ओबीसी आणि महिलांची माफी मागितली पाहिजे. नेपाळने जो आदर्श घातला आहे तोच आदर्श या समुदायाने घेतला पाहिजे असेही ते म्हणाले.

See also  सिंधुदुर्ग किल्ला भारतातील प्रत्येक नागरिकाच्या मनात अभिमानाची भावना निर्माण करतो – प्रधानमंत्री नरेंद्र मोदीमालवण येथे आयोजित 'नौदल दिन २०२३' कार्यक्रमाला प्रधानमंत्री यांची उपस्थिती