“फ्लायओव्हर की ‘FLAW-OVER’? विद्यापीठ चौकातील धोकादायक प्रकारावर पुन्हा प्रश्नचिन्ह”

पुणे | प्रतिनिधी : Savitribai Phule Pune University Chowk सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथील PMRDA कडून उभारण्यात आलेला फ्लायओव्हर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या ठिकाणी पावसाचे पाणी योग्य drainage प्रणालीतून खाली जाण्याऐवजी थेट फ्लायओव्हरवरून खाली रस्त्यावर येत असून, नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

या प्रकारावर नगरसेवक Sunny Nimhan यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी सांगितले की, “फ्लायओव्हरवर साचलेले पाणी drainage मधून खाली जाणे अपेक्षित असताना ते थेट वाहनांवर आणि पादचाऱ्यांवर पडत आहे. हा प्रकार केवळ निष्काळजीपणा नसून नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारा आहे.”

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, जोरदार पावसात या ठिकाणी परिस्थिती अधिकच धोकादायक बनते. अचानक वरून पडणाऱ्या पाण्यामुळे वाहनचालकांचे नियंत्रण सुटण्याची शक्यता निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढला आहे.

विशेष म्हणजे, प्रशासनाने आठ दिवसांत सुधारणा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही ठोस उपाययोजना अद्याप दिसून आलेली नाही. यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

नगरसेवक निम्हण यांनी PMRDA प्रशासनाला स्पष्ट इशारा देत “तात्पुरत्या उपाययोजना थांबवून कायमस्वरूपी तोडगा काढावा. नागरिकांची सुरक्षा ही पर्याय नाही,” असे ठामपणे सांगितले.
दरम्यान, या प्रकारामुळे पुन्हा एकदा शहरातील पायाभूत सुविधांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुणेकरांकडून सुरक्षित आणि दर्जेदार विकासकामांची मागणी जोर धरत आहे.

See also  श्री रवळनाथ हाउसिंग फायनान्स बँक म्हणून उदयास येईल -शिरीष सरदेशपांडे, पोलिस अधिक्षक (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे)