बाणेर येथील प्रथमेश पार्क सोसायटीच्या निवडणुकीत युनायटेड पॅनल बहुमताने विजयी

बाणेर : बाणेर भागातील जुनी व प्रतिष्ठित प्रथमेश पार्क गृहनिर्माण संस्था येथील संचालक मंडळाची निवडणूक उत्साहात पार पडली. या निवडणुकीत युनायटेड पॅनलने बहुमताने विजय मिळवला असून संस्थेच्या कारभाराची धुरा आता नव्या पदाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे.

ही निवडणूक माननीय उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नियुक्त निवडणूक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली शांततेत व पारदर्शक पद्धतीने पार पडली.
७३% मतदान झाले. २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठी निवडून आलेल्या संचालक मंडळामध्ये टिकेकर राजश्री, टोकेकर कल्याणी, लागवणकर योगिनी, ढेपे अनिल, तांबोळी शब्बीर, कुरैशी अयाझ, घाटोळ अमित, भुयार शंकर सदस्यांचा समावेश आहे.

सुमारे २० एकर परिसरात वसलेली प्रथमेश पार्क सोसायटी ही बाणेरमधील एक प्रमुख व सुसज्ज निवासी वसाहत मानली जाते. नव्याने निवडून आलेल्या संचालक मंडळाकडून सोसायटीच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

See also  अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे शहर वतीने शिवजयंती निमित्त शिवजन्मोत्सव ९५ स्वराज्य रथ यांचे स्वागत