वसुंधरा अभियान रक्तदान शिबिरात २२७ रक्तदात्यांचे रक्तदान

बाणेर :  वसुंधरा अभियान बाणेर या वृक्षसंवर्धन व पर्यावरण पूरक उपक्रम संस्थेच्या वतीने १४ वे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. डॉ महानंद माने प्राचार्य शेतकी महाविद्यालय शिवाजी नगर पुणे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत बाणेर पुणे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी नगरसेविका रोहिणी चिमटे, सामाजिक कार्यकर्ते राहुल कोकाटे, लहू बालवडकर, जयेश मुरकुटे, अनिकेत मुरकुटे,  प्रवीण शिंदे, मॉर्निंग ग्रुप पाषाणचे कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी सर्पमित्र गणेश माने यांनी साकारलेल्या रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधले. ज्ञानेश्वर कोटगिरे यांच्याकडून प्रत्येक रक्तदात्यास एक झाड देण्यात आले. तसेच वसुंधरा अभियांकडून पर्यावरण कापडी पिशवी व प्रमाणपत्र देण्यात आले. २२७ रक्तदात्यांपैकी प्रथम रक्तदान करणारे तरुण तर होतेच शिवाय १५ महिलांनी २१२ पुरुषांनी रक्तदान केले.

सन 2006 पासून वसुंधरा अभियान मार्फत तुकाई टेकडीवर वृक्षारोपण व संवर्धन कार्य चालू असून संस्थेने टेकडीवर आत्तापर्यंत 55 हजार पेक्षा अधिक देशी झाडांची लागवड करून संवर्धन केले आहे. पर्यावरण कार्यासोबत सामाजिक बांधिलकी म्हणून 14 वर्षापासून रक्तदान शिबिर आयोजित करत आहे. जनकल्याण रक्तपेढी मार्फत याचे संकलन केले असून व गरजू रुग्णांना त्याचा उपयोग होईल.

See also  आम आदमी पार्टी जिल्ह्यात सर्व स्थानिक निवडणुका लढवणार , घराणेशाही विरोधात प्रामाणिक युवक निवडणुकीत उभे करणार : आम आदमी पार्टी