पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची २४वी मासिक कार्यकारणी बैठक संपन्न

पुणे : पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची २४ वी मासिक कार्यकारणी बैठक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, गंजपेठ,पुणे येथे संपन्न झाली.

या बैठकीला पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, खासदार वंदना चव्हाण, जेष्ठ नेते अंकुशअण्णा काकडे,भगवानराव साळुंखे, डॉ.सुनील जगताप, काकासाहेब चव्हाण,श्रीकांत पाटील, उदय महाले,मृणालिनी वाणी,किशोर कांबळे, सुषमा सातपुते,विक्रम जाधव,अजिंक्य पालकर,दिपक कामठे, गणेश नलावडे,निलेश वरे यांच्यासह सर्व सेलचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष व कार्यकारणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, देशाचे लोकनेते आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आजवर महाराष्ट्राच्या राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, कृषी व औद्योगिक या सर्व क्षेत्रांमध्ये शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आपले भरीव योगदान दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष आणि या पक्षाचे आम्ही सर्व सामान्य कार्यकर्ते आदरणीय पवार साहेबांच्या छत्रछायेखाली कायम सामाजिक प्रश्नांसाठी लढत आलो आहोत. आज काही मत-भिन्नता असल्याने पक्षातील काही सन्माननीय सदस्यांनी वेगळी वाट निवडली असली तरी ८३ वर्षाच्या या योध्याला सोडून कुठलाही दुसरा विचार करणे आम्हाला शक्य नाही. कालांतराने पक्षातील हे समज-गैरसमज दूर होतील. परंतु आज मात्र सर्वजण आदरणीय पवार साहेबांच्या सोबत आहोत आणि कायम स्वरूपी राहणार .

या बैठकीत आगामी निवडणूकी संदर्भात तसेच सभासद नोंदणी व बूथ कमिटीबाबत सर्व पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना सूचना करण्यात आल्या.

राज्यातील शिंदे -फडणवीस सरकार राज्यातील प्रश्न सोडवण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहे. राज्यातील शेतकरी, नोकरदार, अल्पभूधारक,अल्प उत्पन्न गटातील नागरिक व सर्वसामान्य जनता अनेक अडचणींना सामोरे जात असताना विरोधीपक्ष म्हणून सर्वसामान्य नागरिकांची बाजू मांडण्याची काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करत आहे.राज्यातील जनतेच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विविध आंदोलने करून सातत्याने आवाज उठवत आहे व या पुढेही उठवत राहील असे यावेळी बैठकीमध्ये सांगण्यात आले.

See also  सुशोभीकरण म्हणजे पुण्याचा विकास नव्हे - आम आदमी पार्टी