वाकडमध्ये 2 लाखांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त; एकाला अटक

वाकड, दि. ९ जून २६ – वाकड पोलिसांनी प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात कारवाई करत सुमारे ₹2.08 लाख किमतीचा गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 जून 2026 रोजी दुपारी 3.45 वाजण्याच्या सुमारास बजाज ऑटो लक्ष्मी मोटर्सच्या मागील पत्र्याच्या चाळीतील एका खोलीवर छापा टाकण्यात आला. कस्पटे वस्ती रोड, वाकड येथील या कारवाईत किरणसिंग मोहनसिंग सोळंकी (वय 32) याच्याकडे विक्रीसाठी ठेवलेला प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आला.

जप्त करण्यात आलेल्या मालाची एकूण किंमत ₹2,08,610 इतकी आहे. शासनाने बंदी घातलेल्या तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोगासह गंभीर आजार होऊ शकतात, याची माहिती असूनही आरोपी विक्री करत असल्याचे तपासात समोर आले आहे.

याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 298/2026 दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 मधील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

See also  पिंपरी-चिंचवडमध्ये आप आदमी पक्षाला नवे बळ – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त सुरेश गायकवाड यांचा पक्षप्रवेश!